वन विभागाच्या रेस्क्यू टीमचे ऑपरेशन सक्सेस अखेर देडगाव, पाचुंदा परिसरातील बिबट्या जेरबंद.

वन विभागाच्या रेस्क्यू टीमचे ऑपरेशन सक्सेस अखेर देडगाव, पाचुंदा परिसरातील बिबट्या जेरबंद.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव पाचुंदा माका शिवरातील वनक्षेत्र परिसरातील कायम संचार करणारा बिबट्या अनेक दिवसापासून त्याने परिसरात दहशत घातली होती .अनेक प्राण्यांचे बळी घेतले होते. याची महिती वनक्षेत्र अधिकारी यांना आठ दिवसापासून होती. तर ते आठ दिवसापासून तळ ठोकून बिबट्याच्या मागावर होते.

       अखेर त्यांना पाचुंदा शिवारातील गट नंबर 173 मध्ये दादाभाऊ पठारे व अंसाबाई पठारे यांच्या घराशेजारील छोट्या सप्रामध्ये शेळी बांधलेली होती .रात्री बिबट्या येऊन त्याने शेळीचा पडदा फाश केला .व त्या ठिकाणी तो बसून राहिला असता याची खबर सकाळी लागताच वनक्षेत्र अधिकारी ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. व या पठारे कुटुंब घरातील कडी लावून आत बसले होते .त्यांना सकाळी वनाधिकारी एम एस जाधव व एमआय सय्यद यांनी सुरक्षित घराबाहेर काढले.

      नंतर त्यांनी त्यांचे वरिष्ठ अधिकारी राठोड साहेब अहमदनगर यांना दूरध्वनी संपर्क करून ताबडतोब रेस्क्यू टीम ला पाचारण केले. यावेळी जुन्नर या ठिकाणाहून रेस्क्यू टीम घटनास्थळी ताबडतोब दाखल झाली. त्या टीमचे डॉ. चंदन सवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. व अखेर तीन तासाच्या प्रयत्नानंतर त्यांना बिबट्या जेरबंद करण्यात अखेर यश आले.

         यावेळी डि के पातारे वनपाल नेवासा ,एम आय सय्यद वनरक्षक ,कर्मचारी एस आर मोटे, डी टी गाडे, एम एस जाधव, ए,एम गाडेकर , ये बी गोसावी ,आर सी आढागळे ,तसेच जुन्नर रेस्क्यू टी म मधील मधील राजकुमार चव्हाण, बगदुम सय्यद, साकी सय्यद, अमोल पंडित, आदी रिस्की टीम मधील जवान उपस्थित होते.

      तर या कामासाठी नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय करे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कुकाना पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक तुकाराम खेडकर दादा यांनी चोख बंदोबस्त दिला. व या रेस्क्यू ऑपरेशन साठी मोलाचे सहकार्य केले.

    या सर्व वन अधिकारी ,जुन्नर रेस्क्यू टीम व पोलीस कर्मचारी यांनी केलेल्या रेस्क्यू ऑपरेशन बद्दल देडगाव माका पाचुंदा महालक्ष्मी हिवरा परिसातून अभिनंदन होत आहे . यावेळी परिसरातील सकाळपासून परीसरात लोकांनी बिबट्या बघण्यासाठी गर्दी केली होती. बिबट्या जेरबंद होताच परिसरातील लोकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

यावेळी परिसरातील पोपटराव घोरपडे पाचुंदा माजी चेअरमन साहेबराव होंडे, विद्यमान चेअरमन माणिकराव होंडे, मळू

वाघमोडे, देडगावचे युवा नेते निलेश कोकरे, वंचित चे बलभीम सकट ,नितीन ससाने, शौकत पठाण, गुलाब साळवे, बंडू कुटे, संजय देवकाते आदी मान्यवर मोठ्या संख्येने बघण्यासाठी  उपस्थित होते.

     बी पी एस न्यूज नेवासा तालुका प्रतिनिधी युनूस पठाण बालाजी देडगाव.