ता.राहुरी जि. अहमदनगर आज दि.६ . ६ .२०२२ रोजी नव्याने रुजु झालेले सह दिवाणी न्यायाधीशांचे वकिल संघाच्या वतिने स्वागत

ता.राहुरी जि. अहमदनगर आज दि.६ . ६ .२०२२ रोजी नव्याने रुजु झालेले सह दिवाणी न्यायाधीशांचे वकिल संघाच्या वतिने स्वागत

आज दिनांक ६.६.२०२२ रोजी राहुरी कोर्ट या ठिकाणी राहुरी वकील संघाच्या वतीने नव्याने रुजू झालेल्या सह दिवाणी न्यायाधीश बिडकर मॅडम तसेच सह दिवाणी न्यायाधीश तापडिया मॅडम यांचा स्वागत समारंभ व सत्कार सोहळा अतिशय थाटामाटात राहुरी वकील संघाच्यावतीने करण्यात आला सदरच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड. ज्ञानेश्वर येवले यांनी केले तसेच ज्येष्ठ विधिज्ञ अँड. सी.एन. दिघे यांनी पुष्पगुच्छ देऊन सह दिवाणी न्यायाधीश बिडकर मॅडम यांचा सत्कार केला तसेच ज्येष्ठ विधिज्ञ अँड. एस. के.भंडारी यांनी मुख्य न्यायाधीश वाडकर मॅडम यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच ज्येष्ठ विधिज्ञ अँड एच. एन. मोरे यांनी सह दिवाणी न्यायाधीश तापडिया मॅडम यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत व सत्कार केला सदरच्या कार्यक्रमामध्ये अँड. उरे यांनी नव्याने रुजू झालेल्या तापडिया मॅडम आणि बिडकर मॅडम तसेच वाडकर मॅडम यांचे राहुरी कोर्टाच्या वतीने स्वागत करून थोडक्यात मनोगत व्यक्त केले तसेच वकिलांना कायदेशीर सहकार्य करावे अशी विनंती केली तसेच सदरच्या याप्रसंगी अँड. मनिषा लाला पंडित यांनी मुख्य न्यायाधीश वाडकर मॅडम सह दिवाणी न्यायाधीश बिडकर मॅडम सह दिवाणी न्यायाधीश तापडिया मॅडम यांचे राहुरी कोर्टाच्या वतीने व महिला वकील यांच्यावतीने स्वागत केले तसेच वकील आणि न्यायाधीश यांचे नाते अत्यंत महत्वाचे असून ते जपण्याचं कार्य राहुरी बार संघाच्यावतीने नेहमीच होत असून यापुढेही होईल असे प्रतिपादन केले आणि बिरकड मॅडम व तापडिया मॅडम यांचे राहुरी कोर्टातील पुढील कार्यासाठी वाटचालीसाठी त्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या सदरच्या कार्यक्रमांमध्ये मुख्य न्यायाधीश वाडकर मॅडम यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले तसेच सह दिवाणी न्यायाधीश बिडकर मॅडम व सह दिवाणी न्यायाधीश तापडिया मॅडम यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त करून राहुरी वकील संघ याबद्दल चांगल्या प्रतिक्रिया आम्हाला आधीच मिळालेली आहेत असे सांगून आम्हालाही राहुरी बार वकील संघाने चांगले सहकार्य करावे असे प्रतिपादन केले त्यानंतर अँड.के.एन. ढोकणे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले सदरच्या कार्यक्रमात सर्व ज्येष्ठ वकील वर्ग ज्युनियर वकील वर्ग राहुरी बार वकील संघाचे अध्यक्ष अँड. राहुल शेटे महिला उपाध्यक्ष अँड.जयश्री घावटे, अँड. ज्योती राऊत, अँड. सुवर्णा कुलकर्णी , अँड.पल्लवी कांबळे , अँड.आणिता तोडमल , अँड.स्वाती सांगळे, अँड अर्चना मैड, अँड. कल्याणी पागिरे इत्यादी तसेच इतर न्यायालयीन कर्मचारी वर्ग इत्यादी सर्व उपस्थित होते.