माजी विद्यार्थी संघ 2001 ग्रुपच्या वतीने अहिल्याबाई होळकर शाळेमध्ये खेळाडूसाठी टी-शर्ट वाटप.

माजी विद्यार्थी संघ 2001 ग्रुपच्या वतीने अहिल्याबाई होळकर शाळेमध्ये खेळाडूसाठी टी-शर्ट वाटप.

बालाजी देडगाव :- ( प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे माजी विद्यार्थी संघ 2001 ग्रुपने शालेय खोखो व कबड्डी च्या खेळाडूसाठी टी-शर्ट वाटप करण्यात आले.

          आपण या शाळेचे देणे लागतो या शाळेमध्ये खेळलो, बागडलो म्हणून या शाळेला काहीतरी दिलं पाहिजे हा उदात्त हेतू ठेवून हा उपक्रम साजरा करण्यात आला.

नवीन मुलांना प्रेरणा मिळावी भविष्यात त्यांनी संधीचं सोनं करावं हाच हेतू मनात ठेवून शाळेच्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी हा ग्रुप सरसवला आहे.

          हा कार्यक्रम शाळेमध्ये घेण्यात आला .यावेळी  पत्रकार युनूस पठाण व शाळेचे मुख्याध्यापक स्वरूपचंद गायकवाड यांनी मुलांना मार्गदर्शन केले. 

          यावेळी अहिल्याबाई होळकर शाळेचे पर्यवेक्षक चामुटे सर, सहशिक्षक ज्ञानदेव कदम सर, गणेश औटी,सोपान मुंगसे ,किशोर माळवदे ,शरद तांबे, संभाजी मुंगसे ,नवनाथ मुंगसे, देविदास काळे,  ,आदी शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शाळेच्या वतीने माजी विद्यार्थी संघ 2001 ग्रुपच्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला. या स्तुत्य उपक्रमाने परिसरात या ग्रुपचे कौतुक व अभिनंदन होत आहे.
         या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोठुळे सर यांनी केले तर आभार तोडमल सर यांनी मानले.