जेष्ठ संघ कार्यकर्ते डॉ.जयरामजी खंडेलवाल यांचा ७९ वा जन्मदिन संघ प्रार्थनेने साजरा.

जेष्ठ संघ कार्यकर्ते डॉ.जयरामजी खंडेलवाल यांचा ७९ वा जन्मदिन संघ प्रार्थनेने साजरा.


जेष्ठ संघ कार्यकर्ते डॉ.जयरामजी खंडेलवाल यांचा ७९ वा जन्मदिन संघ प्रार्थनेने साजरा.

प्रतिनिधी_प्रसाद घोगरे_9370328944.

कोल्हार येथील श्रेष्ठ संघ स्वयंसेवक व नाशिक विभाग पूर्व सरसंघचालक डॉ.जयरामजी खंडेलवाल यांचा ७९ वा जन्मदिन ८ मे रोजी कोल्हार येथे अत्यंत साधेपणाने अगदी उत्स्फूर्त पणे आणि आकस्मिक साजरा करण्यात आला. डॉ. खंडेलवाल यांना याची कल्पना न देता ज्याला सरप्राइज म्हणतात तसा साजरा करण्यात आला.

डॉ.जयरामजी खंडेलवाल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रभात शाखा आणि संघ प्रार्थना कधीही न चुकवणारे आग्रही स्वयंसेवक आहेत. कोल्हार व परिसरात संघाच्या कामाची मुहूर्तमेढ रवण्यात डॉ. खंडेलवाल यांचां सिंहाचा वाटा आहे, संघ देईल ती जबाबदारी स्वीकारून त्यांनी संघ कामातून आपली एक ओळख निर्माण केली आहे, संघाच्या माध्यमातून डॉ. खंडेलवाल यांनी आदिवासी व अनेक गोर गरीब रु्णांसाठी मोफत शिबिर आयोजित करून उपचार केलेले आहेत, ह्या वयात देखील डॉक्टरांचा संघ कार्याचा उत्साह तरुण मुलांना लाजवेल असाच असतो.

कोल्हार मध्ये आणि पुण्यातही, औक्षण अभिनंदन शुभेच्छा झाल्यावर डाॅक्टरांनी सर्व कार्यकर्त्यांना संघ प्रार्थना करण्याची सूचना केली आणि आमच्या प्रभात शाखेचा टिंगू पण कणखर आज्ञा देणारा स्वयंसेवक चि.तनिष्क मोरे सज्ज झाला आणि त्यांच्या आज्ञेत सर्व तरुण व वृद्ध स्वयंसेवकांनी संघाची प्रार्थना केली. यावेळी शिवाजी उदावंत, बाप्पु दळवी, डॉ काळोखे, अनिल हिरानंदानी, नवीन पटेल, आनंद गुगळे, प्रा. मोरे, तलेरो ई. संघ स्वयंसेवक उपस्थित होते..