आबासाहेब काकडे विद्यालयाचे अविनाश भागवत यांना जिल्हास्तरीय गुणवंत गणित अध्यापक पुरस्कार प्रदान.

आबासाहेब काकडे विद्यालयाचे अविनाश भागवत यांना जिल्हास्तरीय गुणवंत गणित अध्यापक पुरस्कार प्रदान.

आबासाहेब काकडे विद्यालयाचे अविनाश भागवत यांना जिल्हास्तरीय गुणवंत गणित अध्यापक पुरस्कार" प्रदान

 

 

भारत भालेराव

ग्रामीण प्रतिनिधी,

 

आव्हाणे बु: अहमदनगर जिल्हा गणित अध्यापक मंडळ अहमदनगर तर्फे आबासाहेब काकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक श्री अविनाश बन्सी भागवत यांना २०२२-२३ या वर्षाचा "जिल्हास्तरीय गुणवंत गणित अध्यापक पुरस्कार" राज्य गणित मंडळाचे श्री.मच्छिंद्र वीर, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.सुनिल पंडित, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे अध्यक्ष श्री.दिलीप काटे, जिल्हा गणित अध्यापक मंडळ अध्यक्ष श्री.संजयकुमार निक्रड यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आला आहे.यावेळी गणित तालुका प्रमुख श्री.सुधीर आपटे, श्री.सुनिल कारंडे आणि श्री.दिलीपकुमार रमणसिंग उपस्थित होते.श्री.अविनाश भागवत हे एफ.डी.एल. शिक्षण संस्थेमध्ये आबासाहेब काकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेवगाव येथे कार्यरत असून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची भीती दूर करून गणित विषय अत्यंत सोप्या पद्धतीने शिकवून सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला. त्यांनी कोरोना काळात विविध ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले . विद्यालयाच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी पुरस्कार संस्थेला व विद्यालयाला समर्पित करत आहोत अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या राज्य गणित प्रज्ञा परीक्षा२०२३-२३ साठी आबासाहेब काकडे विद्यालय शेवगावचा विद्यार्थी चि.चेतन सोमनाथ मुरदारे हा इ.आठवी मधून पात्र ठरला आहे. एकूण २५३४ विद्यार्थी या परीक्षेत बसले होते पैकी २३७ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आणि ३१ विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड झाली या ३१ विद्यार्थ्यांमध्ये चि.चेतन सोमनाथ मुरदारे हा सिल्वर कॅटेगिरीमध्ये राज्यस्तरावर पात्र ठरलेला आहे. विद्यालयातर्फे त्याचा सन्मान करण्यात आला.श्री.अविनाश भागवत व चि.चेतन मुरदारे यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अॅड.डॉ. विद्याधरजी काकडे साहेब, जि.प.सदस्या सौ. हर्षदाताई काकडे,संस्थेचे विश्वस्त पृथ्वीसिंहभैया काकडे, संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री.लक्ष्मणराव बिटाळ, विद्यालयाचे प्राचार्य श्री. संपतराव दसपुते, उपमुख्याध्यापिका सौ. मंदाकिनी भालसिंग, उपप्राचार्या श्रीम. रूपा खेडकर, पर्यवेक्षिका श्रीम. पुष्पलता गरुड,पर्यवेक्षक श्री सुनील आव्हाड, श्री शिवाजी पोटभरे ,सर्व शिक्षक बंधू- भगिनीं व पालक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दि

ल्या.