प्रिती विनोद डौले या विद्यार्थीनीने राहुरी महाविद्यालयाची वाढवली शान, महाविद्यालयात प्रथम तसेच तालुक्यात कला शाखेतही प्रथम .

प्रिती विनोद डौले या विद्यार्थीनीने राहुरी महाविद्यालयाची वाढवली शान, महाविद्यालयात प्रथम तसेच तालुक्यात कला शाखेतही प्रथम .

*डौले प्रीती विनोद राहुरी महाविद्यालयात प्रथम तसेच तालुक्यात कला शाखेत प्रथम*

 

राहुरी महाविद्यालयाचा उज्वल निकालाची परंपरा अबाधित – एकूण यशप्राप्ती 86.93%”

 

           लोकनेते रामदास पाटील धुमाळ, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने यावर्षीचा निकाल अत्यंत यशस्वीपणे प्राप्त केला आहे. एकूण 597 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, महाविद्यालयाचा एकूण निकाल 86.93% शाखा निहाय निकाल पुढीलप्रमाणे. कला शाखा ६३.४१ टक्के. विज्ञान शाखा ९१.७८ टक्के. वाणिज्य शाखा ८५.१५ 

         संपूर्ण महाविद्यालयात तसेच राहुरी तालुक्यात कला शाखेमध्ये प्रथम क्रमांक कुमारी डौले प्रीती विनोद ८८.१७ टक्के द्वितीय क्रमांक जामकर रोहन राकेश ६४.३३ टक्के तृतीय क्रमांक कुमारी वाघ स्नेहल संदीप ५८ टक्के. विज्ञान शाखेमध्ये प्रथम क्रमांक गीते साक्षी संतोष ८८ टक्के द्वितीय क्रमांक वर शिंदकर तेजश्री रमण ८४.१७ तृतीय क्रमांक बेल्हेकर गायत्री विजय ८१.३३ वाणिज्य शाखेतील प्रथम क्रमांक खुळे अस्मिता श्रीकृष्ण ८६.६७ टक्के द्वितीय क्रमांक वाल्हेकर गौरी भाऊसाहेब ८४ टक्के तृतीय क्रमांक भालेकर सौरभ राजेंद्र ७९.८३ टक्के निकाल लागला असून या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत पालकांचा पाठिंबा आणि महाविद्यालयातील गुणवंत प्राध्यापकांचा अभ्यासू आणि मार्गदर्शक वृत्तीचा मोठा वाटा आहे गुणवत्तेच्या वाटचालीत महाविद्यालयाने आणखी एक यशस्वी पाऊल टाकले आहे या उल्लेखनीय निकालाबद्दल प्राचार्य प्रो. डॉ. अनिता अंत्रे तसेच प्रशासकीय अधिकारी गणेश पुरी साहेब महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रो. डॉ. राजेंद्र गोसावी प्रबंधक श्री गणेशराव देशमुख आणि श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अधिक्षक गीताराम चोथे सर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य मंजाबापू उऱ्हे यांनी विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षक व शिक्षकेतर सेवक वर्ग यांचे अभिनंदन केले आहे.