नाशिक येथे विभागिय कृषी सहसंचालक पदी मोहन वाघ रुजू झाले.
दि.२.ऑगस्ट २०२२ रोजी नाशिक येथे कृषी विभागिय सह संचालक पदी मोहन रामभाऊ वाघ हे रुजू झाले आहेत.राहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलसचिव म्हणून श्री वाघ यांनी काम बघीतले.
नाशिक. धुळे.नंदूरबार. जळगाव. यामध्ये हे चार जिल्हे आहेत या अगोदर ते ठाणे येथील विभागीय सहसंचालक कार्यालयात ते जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होते श्री वाघ यांची पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे.
नाशिक जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहीले आहे. उपविभागिय व नाशिक विभागिय सहसंचालक कार्यालयात ते जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी म्हणून ते कार्यरत होते.
याशिवाय विदर्भ व नंदूरबार येथेही त्यांनी चांगल्या प्रकारे काम पाहिले कोकण विद्यापीठामध्ये कुलसचिव म्हणून त्यांनी काम पाहीले तसेच कुलगुरूंचाही अतिरीक्त पदभार श्री वाघ यांनी चांगल्या प्रकारे पाहिला त्यांचे मुळ गाव ( बार्डे ता. कळवण जि. नाशिक ) हे आहे शेतकर्यांसाठीच्यासाठी सरकारी विविध योजना लाभा करीता कायम त्यांचे अगदी शेतकर्यांसाठी कर्तव्यदक्ष असलेले श्री वाघ म्हणाले कि शेतकर्याला शेती परवडणारी व्हावी म्हणून विविध योजनांचा व उद्योगांविषयी ते नेहमी सांगत असतात. ..