मोठ्या दिग्गजांचा आज शिवसेनेत पक्षप्रवेश, माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत.

मोठ्या दिग्गजांचा आज शिवसेनेत पक्षप्रवेश, माजी मंत्री  शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत.

प्रतिनिधी संभाजी शिंदे खेडले परमानंद नेवासा

बेलपिंपळगाव गणात पंचायत समिती लढवणारे नवनाथ पठाडे यांचेसह महिपत शेळके,बाळासाहेब आहेर यांची मुरकुटे गटाला सोडचिठ्ठी.

मा मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत प्रवेश

गेल्या अनेक दिवसांपासून मा आ बाळासाहेब मुरकुटे यांच्यावर नाराज असलेल्या नेवासा तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी मा मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केलेला आहे.

आ शंकरराव गडाख यांचे मंत्रिपद जाऊनही त्यांच्या नेतृत्वावर विश्वास असलेले अनेक कार्यकर्ते नेवासा तालुक्यात शिवसेनेच्या शंकरराव गडाख गटात प्रवेश करत आहेत.

सोम दि 1 ऑगस्ट 2022 रोजी गोधेगाव ता नेवासा येथील मा आ बाळासाहेब मुरकुटेकडून पंचायत समिती लढवलेले नवनाथराव पठाडे यांचेसह प्रगतशील शेतकरी महिपती शेळके,दत्तात्रय शेळके,रमेश चौधरी यांचेसह अनेक तरुण कार्यकर्त्यांनी मा आ मुरकुटे यांना सोडचिठ्ठी देत मा मंत्री शंकरराव गडाख गटात व शिवसेनेत जाहीर प्रवेश केला 

याप्रसंगी बोलतांना नवनाथराव पठाडे म्हणाले की मा मंत्री शंकरराव गडाख यांनी गोधेगाव व परिसरात अनेक विकास कामे केली आहेत भूलथापा देण्यापेक्षा त्यांचा प्रत्यक्ष कामांवर भर आहे काम करणाऱ्या माणसाचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सर्वांनी प्रवेश केलेला आहे यापुढे सदैव आ शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करू असे नवनाथराव पठाडे म्हणाले.

याप्रसंगी बोलताना मा मंत्री शंकरराव गडाख म्हणाले की गोधेगाव व परिसरातील विकासकामांसाठी मी नेहमी कटिबद्ध असतो गोधेगाव साठी महत्वाच्या असणारी घोगरगाव पाणी योजनेस निधी मंजूर करण्यात आलेला आहे किसनगिरीजी महाराज जन्मभूमी ते श्री क्षेत्र देवगड प्रवासासाठी बोट दिलेली आहे त्यामुळे भाविक व विद्यार्थी यांची गैरसोय दूर होणार आहे.

मा खा यशवंतराव गडाख व स्व मारुतराव घुले पा यांचा विचार घेऊन गोधेगाव व परिसराच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहू.तालुक्यातील विरोधकांनी व्यक्तिगत पातळीवर कितीही त्रास दिला तरी तो आपल्या सर्वांच्या साथीने निश्चितच परतावून लावू प्रश्न छोटा असो वा मोठा त्यास सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू.

फक्त

राजकारण न करता सर्वाना न्याय देऊ

पक्षात आलेल्या नवीन कार्यकर्त्यांना निश्चितच सन्मान देऊ.विकासकामांसाठी सर्व मिळून प्रयत्नशील राहू आपली त्यासाठी साथ हवी असे मा मंत्री शंकरराव गडाख म्हणाले.

याप्रसंगी योगेशराव होंडे मा सरपंच,राजेंद्र गोलांडे सरपंच गोधेगाव,सुदामराव तागड,काकासाहेब शिंदे ,विजय माळवदे राहुरी,बाबासाहेब कवडे,कडूबाळ कर्डीले,नवनाथराव पठाडे

प्रास्ताविक स्वागत बाळकृष्ण भागवत यांनी केले.आभार दिलीपराव शेलार यांनी मानले

याप्रसंगी 

बेलपिंपळगाव,घोगरगाव,गोधेगाव, नेवासा बु,बहिरवाडी,धामोरी, प्रवरासंगम,टोका वाशीम,

उ खालसा,जैनपुर, बेलपांढरी,गळनिंब,मंगळापुर,खेडले काजळी,शिरसगाव, वरखेड,माळेवाडी,सुरेगाव दही,देवगड,बकुपिंपळगाव,

खलालपिंप्री,मडकी या गावांमधील व परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते..

मा आ मुरकुटेना जोरदार झटका.

गोधेगाव ता नेवासा येथील पंचायत समिती लढवणारे नवनाथराव पठाडे,महिपती शेळके व भालगावचे उपसरपंच बाळासाहेब आहेर यांच्या प्रवेशाने मा आ मुरकुटे यांना जोरदार झटका बसला आहे