टोपीवर टोपी टोपी खाली टक्कल आरक्षणापायी बंद पडली, भल्या भल्यांची अक्कल

टोपीवर टोपी टोपी खाली टक्कल आरक्षणापायी बंद पडली, भल्या भल्यांची अक्कल

प्रतिनिधी संभाजी शिंदे खेडले परमानंद नेवासा

जिल्हा परिषद पंचायत समिती आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता निवडणुकीच्या रणांगणात रणरागिनी सरसावल्या.

          या लढती साठी इच्छुक महिलांनी आपली तयारी दर्शवत मोठा सहभाग नोंदवला आहे

           राजकीय क्षेत्रात आपले कर्तुत्व वर्चस्व सिद्ध करण्याची संधी नगर जिल्ह्याला मिळाली आहे आणि या संधीचा सोनं या महिला नक्कीच करतील

             उमेदवारी घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रत्येक महिलेमध्ये असा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे ,की मीच असेल या गटाची भाग्यविधाती. व त्या अनुषंगाने मलाच मिळणार उमेदवारी असा एक आत्मनिच्चय घेऊन महिला पुढे येत आहे

          आणि हीच भावना समोर ठेवून खेडले काजळी येथील माजी सरपंच निर्मला अशोकराव ढगे यांनी जिल्हा परिषदेसाठी सलबतपुर गटातून इच्छुक उमेदवार असल्याची भावना व्यक्त केली. सौ निर्मला ढगे यांची पार्श्वभूमी पाहता या खेडले काजळी  येथील मुख्य रहिवासी असून मागील पंचवार्षिक मध्ये खेडले काजळी येथे सरपंच पदी विराजमान होत्या

            नेवासा तालुक्यामध्ये बहुतांश महिला सरपंच पदावर विराजमान आहेत परंतु खेडले काजळी अशा छोट्याशा गावामध्ये उच्चशिक्षित महिला सरपंच म्हणून त्यांनी काम पाहिले आहे

 

त्यांचे पती अरविंद ढगे कृषी विद्यापीठात माजी कुलगुरू म्हणून काम पाहत होते. त्यामुळे निर्मला अशोकराव ढगे यांच्या मागे डॉक्टर अशोकराव ढगे यांचा राजकीय क्षेत्रातील अभ्यासपूर्ण अनुभव ही तालुक्यामध्ये ओळख आहे

        डॉक्टर अशोकराव ढगे कृषी क्षेत्रातील मार्गदर्शक म्हणून नेवासा तालुका मध्ये नावलौकिक असल्याकारणाने कृषी क्षेत्रातील शासकीय कार्यक्रम असो व त्यांच्या शेतकऱ्यांसाठी दुग्ध आंदोलन असो शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पीक संवर्धन मृदा व जलसंधारण या संदर्भात आपल्या व्याख्यानातून अभ्यासपूर्ण शेतकरी वर्गाला मार्गदर्शन करीत असतात. आणि निर्मला अशोकराव ढगे यांचे माहेर सलाबतपुर येथील असून आता हा नवीन गट जिल्हा परिषद साठी निर्माण झाल्यामुळे एक माहेरवाशीन आपल्या माहेरच्या गटामधून उमेदवारी करण्याची इच्छुक आहे ही गोष्ट उल्लेखनीय आहे

 

 सलाबतपुर तसा राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील गट असून या गटामध्ये आणखीनही मोठ्या प्रमाणात उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहेत. इच्छुकांमध्ये उल्लेख केला तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या कन्या तेजस्विनीताई विठ्ठलराव लंघे, मुळा कारखान्याचे व्हाईस चेअरमन कडूबाळ पाटील कर्डिले यांच्या सुनबाई अनिता भगवान कर्डिले, या सध्या गिडेगाव मध्ये विद्यमान सरपंच आहे

        तसेच कडूबाळ पाटील  कर्डीले यांचा सलाबतपुर  परिसरात राजकीय वारसा व प्रचंड जनसमुदायाशी संपर्क आहे. ही गोष्ट त्यांच्यासाठी राजकीय कारकीर्द घडवण्याच्या दृष्टीने सुवर्णसंधी आहे. सरपंच पदी विराजमान असताना अनिता भगवान कर्डिले यांनी मोठे मोठे विकास कामे खेचून आणलेली आहेत. त्यामुळे आता अनिता कर्डिले आपली राजकीय नशीब आजमावणार असल्याची चर्चा परिसरात होत आहे

       थोडे गंथडी पट्ट्यात नजर मारली तर स्मार्ट व्हिजन म्हणून माघील काळात   गोगलगाव चे माजी सरपंच योगेश म्हस्के यांची चांगली राजिकिय पकड व ओळख ह्या सलाबतपुर गटात आहे त्या मुळे योगेश म्हस्के  यांच्या पत्नी स्नेहल योगेश म्हस्के ह्या ही मोठ्या प्रमाणात निवडणूकित बाजी मारण्याचा दावा ठाम पणे करतांना दिसत आहे, पुढे पहिले  शिवाजी पाठक नजीक चिंचोली येथील कुशल उद्योजक म्हणून त्यांचे  नाव लवकीक आहे त्यांच्या पत्नी  सौ.अनिता शिवाजीराव पाठक यांचे पती शिवाजी पाठक हे आपल्या उद्योग जकांच्या माध्यमातून मोठा त्यांचा राजकीय व सर्व सामान्य वेक्तीं मध्ये सुख दुःखात नेहमी सहभागी असतात त्या मुळे सलाबतपुर गटात त्यांचं ही उमेदवारी साठी देवा केला जात आहे   पुढे पाहिले तर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व सर्व सामान्य जनतेही नाळ जोडलेले नेतृत्व म्हणून ओळख असलेले , अंकुश काळे यांच्या सौभाग्यवती प्राध्यापक मंगल अंकुश काळे, याही प्राध्यापक व उच्चशिक्षित असून त्यांनी वाकडी या गावाची माजी सरपंच म्हणून काम पाहिलेले आहे. तसेच त्यांच्या पाठीमागे त्यांचे पती अंकुश काळे यांचे मोठे राजकीय पाठबळ असून राजकारणात ते कार्यरत आहेत भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या पदावर विराजमान आहेत तरी त्याही सलबतपुर गटांमध्ये दावा करू शकतात

 

    तसेच मागील कैलास झगरे यांच्या पत्नी माजी पंचायत समिती सदस्य  सविता कैलास झगरे यांचे पुन्हा एकदा सलाबतपुर गटामधून राजकीय वर्चस्वच्छ बाजी लावण्याची चर्चा समोर येत आहे

सौ.सविता झगरे यांनी मागील काळात अनेक कामे मार्गी लावलेली असून जनतेमध्ये वर्चस्व आहे. आणि केलेल्या विकास कामाच्या माध्यमातून त्या पुन्हा या उमेदवारीच्या  तयारी त आहे

     तसेच गंगथडी पट्टा म्हटलं तर गोगलगाव मध्ये राजेंद्र एकनाथ मते, यांच्या सौभाग्यवती स्वाती राजेंद्र मते यांचीही गोगलगाव गटामध्ये उमेदवारीसाठी दावा करण्याची शक्यता नाकारता येत नाही

 

 परंतु येणाऱ्या काळातच चित्र स्पष्ट होईल की गटातील संभाव्य जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवार कोणाच्या सौभाग्यवती नां प्राप्त होईल

परंतु महिला आरक्षणामुळे श्रीमान यांची चांगलीच कोंडी झाली आहे व हिरमोड झाल्याचे चित्र समोर येत आहे

       टोपीवर टोपी -टोपी खाली टक्कल महिला आरक्षणामुळे बंद पडली, भल्या भल्यांची अक्कल. अशी परिस्थिती ह्या म्हणी सारखी झाली झाली आहे...