शासकीय योजनांबाबत अधिकाऱ्यांनी अभिनव प्रयोग राबवावेत व ग्रामस्थांना प्रामाणिक सहकार्य करावे - आ. कानडे

कोल्हार खुर्द:- राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द  येथे आज शासण आपल्या दारी जनसंवाद यात्रा श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संन्मानिय श्री.लहु कानाडे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली व कोल्हार खुर्द काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुरेश महादु शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या कार्यक्रमासाठी उप तहसीलदार मा. देवकाते मॅडम, राहुरी तालुका काँग्रेस चे सरचिटणीस संजय भोसले,अनिल पाटील,सुनिल पाटील, राम मदिरा चे अध्यक्ष रामनाथ गाढे पाटील,कॉग्रेसचे मार्गदर्शक एकनाथ कानाडे गुरूजी,  कोल्हार खुर्द काँग्रेस उपाध्यक्ष रखमाजी श्रिरसागर, बबनराव शिरसाठ, रविंद्र शिरसाठ,पुजा जाधव , बाबासाहेब लोढे,मछ्रिद जाधव, मोहन शिरसाठ, श्रीधर शिरसाठ, कोल्हार खुर्दच्या ग्रामसेवक  कविता आहेर, विस्तार अधिकारी, कामगार तलाठी राहाणे (भाऊसाहेब), अशा वर्कर, अंगणवाडी सेविका,कोल्हार आरोग्य उपकेंद्र चे डॉ.गौतम शिरसाठ,गुहा चे आरोग्य सेवक संदीप लोखडे, कोल्हार खुर्द प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सर,आदि प्रमुख ग्रामस्थ, उपस्थित होते .कोल्हार खुर्द मध्ये आमदार लहु कानाडे यांच्या निधीतून पाच शाळेला कॉम्पुटर संच दिले तसेच गावात विविध ठिकाणी  हायमॅक्स दिवे दिले,गावातिल ग्रामदैवत असलेल्या मारूती मदिरा समोर पिव्हिबॉल्क दिले याबद्दल संजय भोसले यांनी आमदार यांचे आभार व्यक्त केले.

आपल्या मार्गदर्शनात आमदार कानाडे म्हणाले गावातील कुठलेही सामाजिक प्रश्न असतील तर ते सोडविण्यासाठी मी बादिल आहे. तसेच शासनाच्या सर्व योजनाची माहिती ग्रामस्थांना प्रशासनाने माहिती दिली पाहिजे,  कुठल्याही योजनेत भ्रष्टाचार होता कामा नाही आशा सुचना प्रशासनाला दिल्या. 

गावातील  विविध ठिकाणी दिलेल्या निधी बद्दल  आमदार लहु कानडे यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.