हरेगाव प्रकरणातील पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी नाना गलांडे टोळीवर मोका अंतर्गत कारवाईसाठी 15 सप्टेंबरला रिपाईचा रस्ता रोको आंदोलन.
श्रीरामपूर - दि. १२ सप्टेंबर २०२३, नाना गलांडे टोळीवर मोका अंतर्गत कारवाईसाठी 15 सप्टेंबरला रिपाईचा रस्ता रोको आंदोलन. नाना गलांडे टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, सावकारकीच्या धंद्यातून लुबाडलेल्या लोकांच्या जमिनी परत कराव्यात, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक श्रीरामपूर या ठिकाणी बेमुदत साखळी उपोषणाची सुरुवात करण्यात आली त्यावेळी डी वाय एस पी डॉक्टर बसवराज शिवपुजे व तालुका पोलीस स्टेशनचे पीआय श्री. दशरथ चौधरी यांनी उपोषण स्थळी भेट दिली. त्यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाषदादा त्रिभुवन म्हणाले की नाना गलांडे आजही मोकाट फिरत आहे. त्यामुळे समाजामध्ये असंतोषच्या भावना निर्माण झाले आहे. त्याला त्वरित अटक करून त्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करावी. या मागणीसाठी शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, श्रीरामपूर या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्याचा जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी दिला आहे. यावेळी रिपाई नेते राजाभाऊ कापसे, बेलापूरचे महेंद्र साळवी, हरेगावचे सरपंच दिलीप त्रिभुवन, जिल्हा तालुकाध्यक्ष सुनील शिरसाट यांचे भाषण झाली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र मगर, जिल्हा संघटक राजूनाना गायकवाड, जिल्हा सरचिटणीस मनोज काळे, तालुकाध्यक्ष सुनील शिरसाट, शहराध्यक्ष विजय पवार, युवक शहराध्यक्ष विशाल सुरडकर, तालुका संघटक संजय बोरगे, तालुका सरचिटणीस जाधव निलेश, जाधव हितेश पवार, बंडू सुतार, मोहन आव्हाड, मोजेस चक्रनारायण, अतुल काळे, सतीश उंबरडे, संकेत बोरगे, रमेश आमोलीक, विशाल गायकवाड, अमित काळे, निलेश जाधव, सलीम पठाण, गणेश सोनवणे, महेश चक्रनारायण तसेच हरेगाव प्रकरणातील पीडित कुटुंब शुभम माघाडे, ओम गायकवाड, कुणाल मगर, श्रीकला मगर, देविदास मगर, अरविंद खंडागळे व आदी उपस्थित होते.