छत्रपती शिवाजी महाराज विटंबना प्रकरणातील आरोपींना अटक न झाल्यास समाजात तेढ निर्माण होऊन सामाजिक अशांतता निर्माण होवू शकते - देवेंद्र लांबे पा .
*छत्रपती शिवाजी महाराज विटंबना प्रकरणातील आरोपींना अटक न झाल्यास समाजात तेढ निर्माण होवून सामाजिक अशांतता निर्माण होवू शकते. – देवेंद्र लांबे पाटील*
राहुरी येथे बुधवार दि.२६ मार्च २०२५ रोजी राहुरी शहरात “छत्रपती शिवाजी महाराज” यांच्या मूर्तीला काळे लावून अज्ञात व्यक्ती द्वारे विटंबना करण्यात आली होती.सदरील घटनेला ४ महिने होत आले आहेत तरी देखील घटनेतील आरोपींना अद्याप अटक करून कारवाई करण्यात आलेली नाही.याच विषयावरून जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांची पोलिस मुख्यालय,अहिल्यानगर येथे मराठा संस्थेचे संस्थापक /अध्यक्ष तथा मराठा एकीकरण समितीचे देवेंद्र लांबे पाटील,नितीन पटारे,प्रविण देवकर,महेंद्र शेळके यांनी भेट घेतली आहे.
या प्रसंगी देवेंद्र लांबे पाटील यांनी म्हंटले आहे कि, “छत्रपती शिवाजी महाराज” यांच्या मूर्तीची विटंबना प्रकार आजपर्यंत महाराष्ट्रातच काय तर संपूर्ण भारतात अशी घटना घडलेला नाही. अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत “छत्रपती शिवाजी महाराज” यांच्या मूर्तीची विटंबना घडून देखील आरोपीला अद्याप अटक न झाल्याने छत्रपती शिवशंभू प्रेमींच्या मनात प्रचंड प्रमाणात रोष निर्माण होत आहे.पोलिस प्रशासनाकडून सबंधित प्रकरणातील आरोपींनवर कायदेशीर कारवाई न केल्यास राहुरी शहरासह तालुक्यात सामाजिक तेढ निर्माण होवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो.या घटनेचे पडसाद अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर उमटू शकतात.छत्रपतींच्या भूमीत छत्रपतींच्या मूर्तीची विटंबना करणारा आरोपी सापडत नसेल तर संपूर्ण महाराष्ट्रातील छत्रपती शिवशंभू प्रेमिंवर मोठी खेदाची बाब आहे.सबंधित प्रकरणातील आरोपींना अटक करून कठोर शासन होणे गरजेचे आहे.सबंधित प्रकरणातील आरोपीवर कारवाई न झाल्यास भविष्यकाळात अशा नीच प्रवृत्ती असणाऱ्यांचे मनोबल वाढले जाईल,व भविष्यकाळात या नीच मानसिकतेचे लोक कोणतीही समाज विघातक घटना घडविण्यासाठी मागे पुढे पाहणार नाहीत.यामुळे सामाजिक तेढ निर्माण होवून अशांतता निर्माण होवू शकते. छत्रपतींच्या मूर्तीची विटंबना म्हणजे छत्रपतींच्या विचारांवर काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा अपमान आहे. त्यामुळे सबंधित घटनेतील दोषींना शोधून कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे अवाहन मराठा एकीकरण समितीच्या वतीने करण्यात येत आहे असे देवेंद्र लांबे पाटील यांनी म्हंटले आहे.








