काय ते बालाजी देडगाव, काय ती जिल्हा परिषद शाळा,काय ते बाल वारकरी, गाव कसं हरी विठ्ठल नामात गजबजून गेले समद कसं ok मधी.

काय ते बालाजी देडगाव, काय ती जिल्हा परिषद शाळा,काय ते बाल वारकरी, गाव कसं हरी विठ्ठल नामात गजबजून गेले समद कसं ok मधी.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे जि. प .प्रा .केंद्र शाळेच्या वतीनं गावस्तरावर गावभर हरी विठ्ठल नामान मिरवणुक काढत कृषीदिंडी अशा पायी बालदिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते .

      या दिंडी सोहळ्यात सर्व पालक , शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य,लहान बालगोपाळ, वयोवृद्ध आजी ,आजोबा यांनी अंतःकरणापासून सहभाग घेतला होता.

       विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा केलेले बालमित्र सजविलेल्या स्थितीत कमरेवर हात ठेवून पुढे उभे होते .तर त्यांच्या पाठीमागे सर्व विद्यार्थी सोबत होते .तुळशीचा कलश घेऊन मुली तर हातात झेंडे व गळयात टाळ घेऊन मुले वेगवेगळ्या जयघोषात तालावर टाळ वाजवून उडया मारत होती. तसेच ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम सन 2022-2023 अंतर्गत कृषिदिंडी वृक्षारोपण सोहळा यांचे पोष्टर व बालदिंडीचा बोर्ड घेऊन चालणारे बाल वारकरी वेगवेगळ्या वेषात आनंदाने चालताना उपस्थितांचे लक्ष वेधित होती . भर पावसातही न थकता सर्वांनी दिंडीचा आनंद घेतला . 

या सर्वांचे ग्रामस्थांचे शाळेचे मुख्याध्यापक सतीश भोसले सर यांनी शाळेच्या वतीने आभारी आहोत . आशा भावना व्यक्त केल्या. व ग्रामस्थांना मॉडेल शाळा बघण्यासाठी येण्याचे आवाहन केले. व ही शााळा जिल्ह्यातील सुंदर मॉर्डन शाळा असेल असा मानस व्यक्त केला.

  या  शाळेच्या परिसरातील वयोवृद्धांनीही प्रतिक्रिया दिली - सर तुमच्या शाळेने आज आम्हांला या उतरत्या वयात साक्षात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन याच बालगोपाळांच्या रूपात झाले व दिंडीत सहभागी झाल्याचा आनंद मिळाला.

या त्यांच्या वाक्याने समाधान वाटले अन आपण केलेला उपक्रम सर्वांना पंढरपूरात घेऊन गेल्याचे समाधान मिळाले.

 मिरवणुक नंतर शाळेत आल्यावर सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात व हरी विठ्ठल नामात मुलाच्या व शिक्षकाच्या फुगड्या खेळण्यात आल्या.

  या सर्व उपक्रमासाठी जि प प्राथमिक केंद्रशाळेतील शिक्षक श्री बथुवेल हिवाळे ,श्री दत्तात्रय धामणे , श्रीम. कविता करांडे ,श्रीम अश्विनी कदम ,श्रीम तेजश्री निमसे ,श्री बाळासाहेब येडे व मुख्याध्यापक श्री. सतिशकुमार भोसले यांनी कृषीदूत -- नागणे वरद , ढवळे सिद्धेश, केदारनाथ पोथूराजू, चव्हाण वैभव, शिंदे अनिकेत, पाटील ऋषभ यांच्यासह नियोजन केले . व या दिंडी साठी कष्ट घेतले.