नाभिक समाजाचा एससी प्रवर्गात समावेश करा या मागणीसाठीअहमदनगर शहरात कार्यकर्त्यांचे आमरण उपोषण.
नाभिक समाजाचा 'एससी' प्रवर्गात समावेश करा या मागणीसाठी.
अहमदनगर शहरातील कार्यकर्त्यांचे आजपासून अमरण उपोषण...
घोडेगाव (वार्ताहर)राज्यातील नाभिक समाजाचा समावेश 'एससी' प्रवर्गात करण्याची मागणी गेले कित्तेक वर्ष सरकार दरबारी प्रलंबित आहे.आपल्य याच मागणीसाठी समाजाने आजवर सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही कोणत्याही शासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार केलेला नाही.परिणामी हक्काचे दावेदार असून आणि केंद्र सरकारने शिफारस करूनही राज्यभरातील तमाम नाभिक समाज या महत्वपूर्ण मागणीपासून वर्षानुवर्ष वंचित आहे.
मात्र अहमदनगर शहरातील नाभिक समाज आता आपल्या हक्काच्या मागणीसाठी आक्रमक झाला असून त्यांनी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने आज मंगळवार दिनांक १२ सप्टेंबर पासून आमरण उपोशनाचे हत्यास उपसले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या संतश्रेष्ठ सेना महाराजांच्या पुण्यतिथीच्या दरम्यान हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष शांताराम राऊत यांनी सांगितले.
या आमरण उपोषणात जिल्हा अध्यक्ष शांताराम राऊत यांच्यासह प्रदेश कार्य कारणी सदस्य विकास मदने,शिवाजी राव दळवी,कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश शिंदेसर, अजय कदम,अरुण वाघ आदी कार्यकर्ते उपोषणात बसणार असून, महाराष्ट्रातील तमाम समाज बांधवांना विनंती करण्यात आली आहे की, हीच वेळ आहे सामाजिक ऐक्याची,समाजाच्या मागण्यांसाठी आता सर्वांनी एकजुटीने रस्त्यावर उतरावे,आम्ही अहमदनगर शहरातून सुरुवात केलेलीच आहे, इतर संघटनांनी समाज कार्यकर्त्यांनीही आता प्रत्तेक ठिकाणी स्थानिक प्रशासनास आपल्या हक्काच्या मागणीचे निवेदन देऊन या आरक्षणाच्या मुद्द्यास महाराष्ट्रभर निवेदनामार्फत जाहीर पाठिंबा द्यावा असे आवाहन समाजाला करण्यात आले आहे.
याच विनंती वजा अवाहणाची दखल राज्यभरातील नाभिक समाज घेत असून विविध संघटनांनी आपला थेट पाठींबा या आंदोलनाला जाहीर केला आहे.
सध्या तरी या उपोषणात अहमदनगर शहरातील महाराष्ट्र नाभिक महामंडळ,महाराष्ट्र अहमदनगर नाभिक समाज ट्रस्ट,तसेच अहमदनगर नाभिक सलून संघटना व सलून चालक मालक संघटना सहभागी झाल्या असून लवकरच जिल्ह्यातील विविध संघटना देखील सहभागी होणार असल्याचे अध्यक्ष राऊत यांनी यावेळी सांगितले.