महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयात प्रवेशोत्सव नवीन शालेय पुस्तक व मिठाई वाटपाने साजरा .

अहिल्यानगर प्रतिनिधी// दि १६
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी दि १६ रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय शिरेगाव - खेडले परमानंद या विद्यालयात इयत्ता पाचवीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प, पेन, मोफत पाठ्य पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले .तसेच पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे आणि मिठाईचे वाटप करण्यात आले .
या कार्यक्रमासाठी शिरेगावचे सरपंच निरंजन तुवर ,खेडले येथील शिक्षण प्रेमी नागरिक नय्यूमभाई इनामदार , पत्रकार संभाजी शिंदे , युवक कार्यकर्ते योगेश वैरागर, गोरक्षनाथ जाधव आणि पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . यावेळी बोलताना विद्यालयाचे मुख्याध्यापक ढाले सर यांनी प्रास्ताविकात शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती पालकांना दिली.
नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन त्यांच्या बौद्धिक विकासाकडे लक्ष केंद्रित केले जाईल .
त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना अभ्यासा बरोबरच भौतिक ज्ञानविकसित होण्याच्या दृष्टीने पालकांनी विद्यार्थ्यांकडे लक्ष केंद्रित करावे अशी प्रतिपादन विद्यालयाचे मुख्याध्यापक ढाले सर यांनी केले.