घरफोडी करणा-या टोळीतील 03 आरोपी मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

अहिल्यानगर प्रतिनिधी//
घरफोडी करणा-या टोळीतील 03 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद
5,22,000/-रू किंमतीचे 58 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने जप्त
1 जबरी चोरी व 5 घरफोडीचे गुन्हे उघड मीरा भुजंग दहिफळे दत्तनगर, पाथर्डी, याचे राहते घराची अज्ञात आरोपीतांनी खिडकी तोडून, घरात प्रवेश करून त्यांना चाकुचा धाक दाखवून सोन्याचे दागीने व रोख रक्कम जबरीने चोरून नेली.याबाबत त्यांनी पाथर्डी तालुका पोलीस स्टेशन येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता .
पोलीस अधिक्षक,अहिल्यानगर यांनी आदिशित केल्या प्रमाने
पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, फुरकान शेख, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, सुनिल मालणकर, भगवान थोरात, प्रशांत राठोड, महादेव भांड अशांचे पथक नेमुण जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
दिनांक 16/06/2025 रोजी पथक वर नमूद गुन्हयाचा गोपनीय माहिती व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना नमूद गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी गणेश दिवाणजी काळे, रा.वाकोडी फाटा, दरेवाडी, ता.अहिल्यानगर याने त्याचे साथीदारासह केला असून ते मोटार सायकलवर दरेवाडी येथून अहिल्यानगरकडे येत असल्याची माहिती मिळाली. पथकाने मिळालेल्या माहितीवरून चांदणी चौक, अहिल्यानगर येथे सापळा रचुन संशयीत आरोपीचा शोध घेऊन 1) गणेश दिवाणजी काळे, वय 28, रा.वाकोडी फाटा, दरेवाडी, ता.अहिल्यानगर 2) रोहित नादर चव्हाण, वय 23, रा.चिचोंडी पाटील, ता.अहिल्यानगर 3) रोहित लल्या भोसले, वय 20, रा.सराटी वडगाव, ता.आष्टी, जि.बीड अशांना ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीकडे गुन्हयाबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे साथीदार 4) रावण नादर चव्हाण, रा.चिचोंडी पाटील, ता.अहिल्यानगर (फरार) 5) फिलीप नादर चव्हाण, रा.चिचोंडी पाटील, ता.अहिल्यानगर (फरार) 6) नागु पंडया भोसले, रा.सराटी वडगाव, ता.आष्टी, जि.बीड (फरार) याचेसह केल्याची माहिती सांगीतली.
ताब्यातील आरोपीकडे गुन्हयातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता गणेश दिवाणजी काळे याने गुन्हयातील चोरी केलेले सोन्याचे दागीने घराजवळ ठेवल्याचे सांगीतले.पथकाने पंचासमक्ष आरोपीचे घराजवळून 5,22,000/- रू किंमत त्यात 58 ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुंबर, अंगठी, गंठण, कानातील फुले, मिनी गंठण असे सोन्याचे दागीने तपासकामी जप्त करण्यात आले.
पथकाने आरोपी गणेश दिवाणजी काळे यास विश्वासात घेऊन, जप्त करण्यात आलेल्या सोन्याचे मुद्देमालाबाबत व आणखी कोठे गुन्हे केले अगर कसे याबाबत विचारपूस केली असता त्याने वरील साथीदारासह पाथर्डी शहर व पाथर्डी तालुक्यातील गावामध्ये, अरणगाव, ता.अहिल्यानगर व अहिल्यानगर शहरामध्ये चोरी केल्याच्या सांगीतलेल्या माहितीवरून, खालीलप्रमाणे 05 घरफोडी व 01 जबरी चोरी असे एकुण 06 गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1 पाथर्डी 113/2025 बीएनएस 309 (4), 333, 3 (5)
2 पाथर्डी 611/2025 बीएनएस 331 (4), 305
3 नगर तालुका 327/2025 बीएनएस 331 (1), 305 (अ)
4 पाथर्डी 382/2025 बीएनएस 331 (4), 305
5 पाथर्डी 340/2025 बीएनएस 331 (4), 305
6 तोफखाना 537/2025 बीएनएस 331 (4), 305 (अ)
आरोपी गणेश दिवाणजी काळे याचेवर दाखल गुन्हे अभिलेख पडताळणी केली असता तो खालीलप्रमाणे दरोडा व घरफोडीच्या गुन्हयात फरार असल्याचे निष्पन्न झाले.याबाबत पुढील कारवाई करण्यात येत आहे.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1 कोतवाली 1053/2022 भादंविक 395
2 नगर तालुका 851/2023 भादंविक 395
3 नगर तालुका 857/2023 भादंविक 457,380
ताब्यात घेण्यात आलेल्या 03 आरोपीस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदर कारवाई सोमनाथ घार्गे,पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, व सुनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.