शिवजयंती उत्सव समिती अध्यक्षपदी जनार्धन म्हसे तर कार्याध्यक्षपदी अशोक कदम यांची निवड .

शिवजयंती उत्सव समिती अध्यक्षपदी जनार्धन म्हसे तर कार्याध्यक्षपदी अशोक कदम यांची निवड .

*शिवजयंती उत्सव समिती अध्यक्षपदी म्हसे पा. तर कार्याध्यक्षपदी कदम पा.*

 

     *शिवजयंती निमित्त भव्य आरोग्य शिबीर व खेळ पैठणी कार्यक्रम*  

 

             राहुरी येथे मराठा बहुउद्देशीय संस्था संचलित शिवजयंती उत्सव समिती राहुरी तालुका कार्यकारणी सर्वानुमते गठीत करण्यात आली.यावेळी शिवजयंती उत्सव समिती २०२५ चे अध्यक्ष म्हणून जनार्धन उर्फ बंडुशेठ म्हसे तर कार्याध्यक्ष म्हणून अशोक कदम यांची निवड करण्यात आलेली आहे.तसेच यावेळी उपाध्यक्ष किरण पाटील,खजिनदार ईश्वर गाढे,सचिव अरुण निमसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

 

             या प्रसंगी मराठा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र लांबे यांनी सांगितले कि शिवजयंती उत्सव समिती यांच्या वतीने गेल्या १० वर्षांपासून समाजउपयोगी उपक्रम राबविले जातात.त्याच उद्देशाने दि.१९ फेब्रुवारी २५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पांडुरंग मंगल कार्यालय राहुरी येथे सकाळी १० ते सायं. ५ पर्यंत भव्य रोगनिदान शिबीर,महिला गृहउपयोगी स्टोल,तसेच जिजाऊँच्या लेकींच्या सन्मानार्थ सायंकाळी ५ वा. खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.तसेच राहुरी तालुक्यात वैद्यकीय,सामाजिक,शेतकी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान याप्रसंगी केला जाणार आहे असे लांबे पा.यांनी सांगितेल.पुढे बोलतांना म्हंटले आहे कि अलीकडच्या काळात रुधय विकाराच्या धक्याने निधन होण्याचे प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.धावपळीच्या युगात ३० ते ५० वयोगटातील युवकांचे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.शरीराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मृत्यू होत आहेत.ऐन तारुण्यात निधन झाल्यामुळे कुटुंबाच्या-कुटुंब उघड्यावर येत आहेत.त्यामुळे शारीरिक तपासणी होणे गरजेचे आहे.यासाठी मराठा एकीकरण समिती व जिजाऊँच्या लेकी समूह यांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी साठी डॉ.विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल- विळद घाट,लाईफ इन हॉस्पिटल राहुरी व ग्रामीण रुग्णालय राहुरी यांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत तसेच तपासणी दरम्यान गंभीर स्वरूपाच्या रुग्णांसाठी डॉ.विक्रम खुरुद मार्गदर्शन लाभणार आहे कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे अवाहन शिवजयंती उत्सव समितीने केले आहे.

 

             शिवजयंती कार्यक्रम नियोजन समिती मध्ये अविनाश क्षीरसागर,कुलदीप नवले,संदीप गाडे,रोहित नालकर,विजय पटारे, ईश्वर गाढे,दिलीप घुमे,मेजर नामदेव वांढेकर,विनायक बाठे,निखील कोहकडे,सुभाष पवार,रामदास कटारे,मधुकर घाडगे सर,विजय कोहकडे,सुनील निमसे यांची निवड करण्यात आली आहे.