नेवासा तालुक्यातील ज्ञानेश्वर साखर कारखाना, भेंडा व मुळा साखर कारखाना, सोनई यांच्याकडून उस उत्पादक शेतकरी व कारखाना कामगार यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत साखर आयुक्तांना निवेदन.
नेवासा ( प्रतिनीधी ) :- नेवासा तालुक्यातील ज्ञानेश्वर साखर कारखाना, भेंडा व मुळा साखर कारखाना, सोनई यांच्याकडून उस उत्पादक शेतकरी व कारखाना कामगार यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत साखर आयुक्तांना निवेदन दिले. प्रमुख मागण्या.
• उसउत्पादक शेतकऱ्यांचा उस गाळपाला येत असतानी, त्याचे पेमेंट पंधरा दिवसामध्ये करणे शासनाच्या नियमाप्रमाणे बंधन कारक असताना कारखान्याकडून तीन महिने उलटून गेली तरीही शेतकऱ्यांच्या उसाचे पेमेंट मिळत नाही.
• कारखान्याचा उस तोडणी प्रोग्राम हा लेबर अभावी पूर्णपणे विसकळीत झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाच्या खोडक्या होत आहेत.
• शेतकऱ्यांना उस तोडणीसाठी एकरी ५००० रुपये द्यावे लागत आहेत.
• मुळा कारखान्याकडून कामगारांचा पगार १० महिन्यापासून व ज्ञानेश्वर कारखान्यामधील कामगारांचे ५ महिन्यापासून त्यांच्या कामाचा पगार दिला गेलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावरती आर्थिक संकट ओढावले आहे.
• मागील वर्षी दोनही कारखान्याची आर्थिक स्थिती चांगली असतानी अचानक या वर्षी कामगारांचे पगार न होने, शेतकऱ्यांना हि त्यांना उसाचे पेमेंट न मिळणे हे एक संशयास्पद आहे.
• आपण कारखान्यांना उस उत्पादक शेतकरी व कारखान्याचे पगार नियमित करण्या बाबत आदेश करावेत. जर याबाबत कारखान्याने वेळेत पेमेंट न केल्यास शेतकरी उपोषण करण्यात येईल असे निवेदनाद्वारे साखर आयुक्तांना सांगण्यात आले. यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे किसन मोर्चा जिल्हा अध्यक्ष अंकुशराव काळे, प्रसिद्धी प्रमुख रितेश भंडारी, मा.सरपंच अशोकराव टेमक, भाऊसाहेब पवार, संतोष पोटे उपस्थित होते.