जन आधार सामाजिक संघटणेच्या वतिने अहमदनगर पंचायत समितिस भूमिहीनांना घरकुल योजनेच्या लाभाकरीता जमिन उपलब्ध करून द्यावी असे निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रधानमंत्री आवास / रमाई घरकुल योजनेतील भूमीहीन लाभार्थ्यांना 7/12 व 8 अ, ची अट शिथिल करून गावठाण किंवा महाराष्ट्र शासनाच्या वन विभाग/ गायरान जागे व्यतिरिक्त जागेवर घरकुल देण्यात यावे देण्याच्या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने पंचायत समिती येथील कार्यालयीन अधिक्षक सुधीर देऊळगावकर यांना निवेदन देताना जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, अमित गांधी, बाळासाहेब केदारे, गणेश गाडेकर, आप्पासाहेब केदारे, विजय मिसाळ, रोहिणी पवार, सपना ओहळ, याकोब वाघमारे, चंद्रकला बारस्कर, नंदा शेंडे, लंका मोरे, प्रमिला बोठे, निलेश सातपुते, रवी कळमकर आदी उपस्थित होते. मौजे निंबोडी ता.जि.अहमदनगर येथे नव्याने मंजूर झालेल्या प्रधानमंत्री आवास घरकुल योजने अंतर्गत लाभार्थ्यांमध्ये अनेक लाभार्थी हे खरोखरच भूमिहीन आहेत. म्हणजेच त्यांच्या व कुटुंबियांच्या नावावर गावांमध्ये किंवा इतरत्र देखील स्वतःच्या मालकीची जागा नाहीये. परंतु शासनाच्या घरकुल मार्गदर्शक नियमानुसार इतर कागदपत्रा सोबत 7/12 किंवा 8अ चा उतारा जोडणे हा बंधनकारक आहे. संबंधित भूमिहीन कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत हलाखीची असल्याने ते नव्याने जमीन घेण्यास सक्षम नसल्याने ते आपल्याला 7/12,किंवा 8अ चा उतारा जोडुन देऊ शकत नाहीत.परंतु दुसरीकडे शासनच गोरगरीब भूमिहीन लोकांना घर असावे यासाठी आग्रही दिसते. म्हणून यासाठी पर्याय म्हणून आपण मौजे निंबोडी येथील गावठाण हद्दीत असणारी तसेच महाराष्ट्र शासनाची जमीन (वनविभाग/गायरान व्यतिरिक्त) त्यांना घरकुल बांधण्यासाठी देऊ शकत नाहीत का? कारण यापूर्वी देखील निंबोडी ग्रामपंचायत च्या माध्यमातून अनेक भूमिहीन लोकांना आपणच त्या ठिकाणी ( म्हणजे गट नं.378,377,359,) नवीन घरकुलांसाठी परवानगी दिलेली आहे. फक्त निंबोडी गाव च नाहीतर नगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अशा भूमिहीन घरकुल लाभार्थ्यांच्या जागेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि हे लाभार्थी घरकुल मंजूर होऊन देखील फक्त 7/12,आणि 8अ चा उतारा नसल्याने या योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत.या उलट हे लोक,गावातील ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत यांच्याकडे जाब विचारण्यासाठी किंवा गावठाण हद्दीतील जमीन घरकुल योजनेस मागण्यासाठी गेले असता, त्यांना ग्रामपंचायत मार्फत उत्तर दिले जाते की,जर आपण 7/12 आणि 8अ चा उतारा लवकरात लवकर जोडला नाही,तर आपले घरकुल रद्द किंवा इतरांना देण्यात येईल असा धमकी देण्यात येते. गावा गावात अनेक धनदांडग्या आणि जमीनदार लोकांनी याच शासनाच्या किंवा गावठाण च्या जागा अतिक्रमन केलेल्या आहेत.या सर्व शासकीय जागेचा सर्वे करून त्या जागा आपल्याला या भूमिहीन घरकुल मंजूर असणाऱ्या लाभार्थ्यांना देण्यात येणार नाहीत का ? याचा ही विचार व्हावा. मौजे निंबोडी येथील भूमिहीन घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांचा विचार करून त्यांना तातडीने गावातील गावठाण किंवा महाराष्ट्र शासनाच्या जागेवर घरकुल बांधण्याची परवानगी आपल्या प्रशासनामार्फत द्यावी. अन्यथा जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने लाभार्थ्यांसह पंचायत समिती कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.