पिंप्री अवघड गावातील आदिवासी बांधवांना डॉक्टर सौ . उषाताई तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले शिधापत्रिकेचे वाटप .
राहुरी तालुक्यातील पिप्री अवघड येथे महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मंत्री माननीय प्राजक्त तनपुरे यांच्या मातोश्री डॉक्टर सौ .उषाताई तनपुरे यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले . शिधापत्रिकेच्या वाटपाचा कार्यक्रम पिप्री अवघड गावातील हनुमान मंदिरासमोर करण्यात आला होता .
गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी बांधवांना शासनाच्या योजनांचा लाभ काही त्रुटींमुळे घेता येत नाही .यामध्ये प्रमुख्याने घरकुल योजना असेल किंवा स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे राशन हे कागदपत्रांच्या पूर्तते अभावी आदिवासी बांधवांना मिळत नाही .याची दखल घेऊन राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांनी या गोष्टींचा पाठपुरावा करून पिंप्री अवघड गावातील आदिवासी बांधवांसाठी शिधापत्रिका तयार करून घेतल्या .या शिधापत्रिका वाटपाचा कार्यक्रम डॉक्टर सौ.उषाताई तनपुरे यांच्या हस्ते आज करण्यात आला .यावेळी माजी सरपंच श्रीकांत बाचकर यांनी गावातील विविध प्रश्न मांडून डॉक्टर सौ . उषाताई तनपुरे यांचे लक्ष वेधले .अंगणवाडी सेविका रजिया मॅडम,लांबे मॅडम यांनी देखील विविध समस्या मांडल्या.डॉक्टर सौ उषाताई तनपुरे यांनी विचारलेल्या प्रश्नांची चोख उत्तरे पिंप्री अवघडच्या ग्रामसेविका शुभांगी चोखर यांनी दिली.
या कार्यक्रमाप्रसंगी पिंप्री अवघडचे सरपंच रेखाताई पठारे,उपसरपंच लहानु तमनर,माजी सरपंच श्रीकांत बाचकर, ग्रामपंचायत सदस्य सुरेश ( गोपी ) लांबे,अमोल गायकवाड,दत्तात्रय बाचकर , ज्येष्ठ नागरिक सारंगधर लांबे,सोपान लांबे, दीपक बर्डे,लक्ष्मण वैरागर तसेच गावातील नागरिक व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.अनेक वर्षापासून शिधापत्रिकेच्या लाभापासून वंचित असणाऱ्या आदिवासी बांधवांच्या हातात आज शिधापत्रिका मिळाल्यामुळे वेगळाच आनंद दिसत होता .