सोनई बेल्हेकरवाडी रोडवरील चर्च विनियार्ड मध्ये पास्टर कडून अल्पवयीन मुलींचे लैगिक शोषण

सोनई बेल्हेकरवाडी रोडवरील चर्च विनियार्ड मध्ये पास्टर
कडून अल्पवयीन मुलींचे लैगिक शोषण
खेडले परमानंद प्रतिनिधी. //
नेवासा तालुक्यातील सोनई बेल्हेकरवाडी रोडवरील विनियार्ड चर्च मध्ये दि. १५ फ्रेबुरवारी रोजी दुपारी १ ते २ च्या दरम्यान संब चर्च मधील पास्टर ने माणुसकीला काळीमा फासणारे क्रुत्य केल्याची घटना घडली आहे. संबंधित अल्पवयीन मुलींना पैशाचे, चाॅकलेटचे अमिष दाखवून चर्च मध्ये बोलावून या मुलिंवर लैगिक अत्याचार करण्यात आला असल्याचे जाग्रुत नागरीकांमुळे ही घटना उघडकीस आली. या चर्च मध्ये असे गैरप्रकार अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे परिसरातील नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. तरी या घटनेमुळे घबराटीचे वातावरण पसरले आहे. तरुणांचा मोठा जमाव पोलीस ठाण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शेवगाव उप विभागीय अधिकारी सुनील पाटील व सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशिष शेळके यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी करून काही वेळातच संबधित आरोपी उत्तम वैरागर यास अटक केली. रात्री उशिरापर्यंत सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.