*ऑपरेशन मुस्कानमध्ये 109 मुलींची सुटका करणारे राहुरीचे पो. नि. संजय ठेंगे 'द हिरोज ऑफ अहिल्यानगर' पुरस्काराने गौरविले*

*राहुरीचे पो. नि. संजय ठेंगे 'द हिरोज ऑफ अहिल्यानगर 2026' पुरस्काराने सन्मानित; पुरस्कार टीमवर्क, वरिष्ठांचे मार्गदर्शन व सकारात्मक पत्रकारितेला समर्पित*

*ऑपरेशन मुस्कानमध्ये 109 मुलींची सुटका करणारे राहुरीचे पो. नि. संजय ठेंगे 'द हिरोज ऑफ अहिल्यानगर' पुरस्काराने गौरविले*

*शिर्डी/राहुरी, दि. 25 मे 2026*: राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन दैनिक पुण्यनगरीच्या वतीने देण्यात येणारा 'द हिरोज ऑफ अहिल्यानगर सन 2026' हा मानाचा पुरस्कार दि. 24 मे 2026 रोजी शिर्डी येथे प्रदान करण्यात आला.

'ऑपरेशन मुस्कान' अभियानाअंतर्गत पो. नि. ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी पोलिसांनी आतापर्यंत तब्बल 109 मुलींचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात दिले आहे. या विशेष कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश व बीजमाता, पद्मश्री राहिबाई पोपेरे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार स्वीकारताना पो. नि. संजय ठेंगे यांनी तो आपल्या पोलीस स्टेशनमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या टीमवर्कला, मा. राकेश ओला, सोमनाथ घार्गे, मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, सोमनाथ वाघचौरे, डॉ. बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाला, तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील सकारात्मक पत्रकारितेला समर्पित केला.

यासोबतच राहुरी तालुका कलाकार मंच, स्नेहालय संस्था अहिल्यानगर, केअर संस्था पुणे यांनी जनजागृतीसाठी घेतलेला पुढाकार, राहुरी तालुक्यातील शालेय शिक्षक, शिक्षण विभाग व पोलीस पाटील यांच्या सहकार्याला देखील त्यांनी हा सन्मान समर्पित केला आहे.