डिजिटल अरेस्ट ऑनलाईन फसवणुक प्रकरणात अहिल्यानगर सायबरची मोठी कारवाई डिजिटल अरेस्ट प्रकरणात ३ (तीन) आरोपीना अटक

डिजिटल अरेस्ट ऑनलाईन फसवणुक प्रकरणात अहिल्यानगर सायबरची मोठी कारवाई डिजिटल अरेस्ट प्रकरणात ३ (तीन) आरोपीना अटक

डिजिटल अरेस्ट ऑनलाईन फसवणुक प्रकरणात अहिल्यानगर सायबरची मोठी कारवाई डिजिटल अरेस्ट प्रकरणात ३ (तीन) आरोपीना अटक

याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा आहे की संदिप हरिभाऊ कुलथे रा-सावेडी अहिल्यानगर यांची दिनांक २४/१०/२०२५ ते दिनांक २८/१०/२०२५ पर्यंत वेगवेगळया मोबाईल नंबर वरुन फोन करुन व्हाट्सअॅप द्वारे व्हिडीओ कॉल करुन फिर्यादी यांना मुंबई सायबर सेल मधुन बोलत आहे असे सांगुन फिर्यादी यांचेविरुध्द मनि लॉड्रीग हवाला मनी अॅन्ड आयडेटी थेप्ट केस संदर्भात खोटे सांगुन फिर्यादी यांची फसवणुक करण्याकरीता डिजिटल अटक करुन फिर्यादी यांची ८,८०,०००/-रु ची फसवणुक केली अशा प्रकारच्या फिर्यादीवरून सायबर पोलीस स्टेशन अहिल्यानगर येथे गु.रजि.नं.१३/२०२५ भा.न्या.सं.३१८(४).३३६ (३), ३४० (२) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

 

वरील प्रमाणे गुन्हा दाखल झाल्याने सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन सोमनाथ घार्गे पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी . सागर ढिकले पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन अहिल्यानगर यांना सदर गुन्हयाचा बारकाईने व सखोल तपास करुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले. त्यानुसार सदर गुन्हयाचे तपासकामी सागर ढिकले पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन, अहिल्यानगर यांचे अधिपत्याखाली सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक सुदाम काकडे, पोहेकॉ मल्लिकार्जुन बनकर, पोहेकों दिगंबर कारखेले, पोहेकॉ उमेश खेडकर, पोहेकॉ निळकंठ कारखेले, पोहेकॉ रावसाहेब हुसळे यांनी तांत्रिक व कौशल्यपुर्ण तपास करुन सदर गुन्हयातील आरोपी निष्पन्न करुन पथकातील वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी निष्पन्न आरोपीपैकी आरोपी 

 १) विजय रंगनाथ चेमटे रा-भाळवणी ता-पारनेर जि-अहिल्यानगर, 

२) अभिजित अजिनाथ गिते रा-दादेगांव ता-आष्टी जि-विड हल्ली रा-प्रतिक प्लाझा, JSPM कॉलेज शेजारी नन्हे, पुणे,

 ३) अक्षय संजय तांबे रा-सलाबतपुर ता-नेवासा जि-अहिल्यानगर हल्ली रा-द्वारका पॅलेस लक्ष्मी चौक दत्त कॉलनी हिजवडी फेज वन पुणे यांना ताब्यात घेण्यात आले असुन सदर गुन्हयाचे अनुषंगाने यांचेकडे अधिक चौकशी करता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली असुन सदर गुन्हयाचे अनुषंगाने अधिक तपासकामी त्यांना नमुद गुन्हयात अटक केले आहे. आरोपी यांना मा. न्यायालयात हजर केले असुन सदर आरोपी यांना पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. आरोपी यांचेकडुन आणखी इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास सागर ढिकले पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन अहिल्यानगर हे करीत आहेत.

 

सदरची कामगिरी मा सोमनाथ घार्गे पोलीस अधिक्षक अहिल्यानगर, वैभव कलुबमें अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर, दिलीप टिपरसे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले, पोलीस उप निरीक्षक सुदाम काकडे, पोहेकॉ मल्लिकार्जुन बनकर, पोहेकों दिगंबर कारखेले, पोहेकॉ उमेश खेडकर, पोहेकॉ निळकंठ कारखेले, पोहेकॉ रावसाहेब हुसळे, पोकॉ अमोल आव्हाड यांचे पथकाने केलेली आहे.

 

सायबर पोलीस स्टेशन, अहिल्यानगर यांचेकडून आवाहन करण्यात येत आहे की, संशयास्पद अनोळखी लिक, कॉल, OTP किंवा अनोळखी व्यव्हारांवर विश्वास ठेवु नका. फसवणुक झाल्यास तात्काळ सायबर हेल्पलाईन १९३० किंवा १९४५ वर किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला तात्काळ संपर्क करुन आपली तक्रार नोंदवा .