छ . शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा जुन्या पाण्याच्या टाकीच्या जागेत बसवा .
*“छ.शिवाजी महाराज” यांचा अश्वारूढ पुतळा जुन्या पाण्याच्या टाकीच्या जागेत बसवा.*मराठा एकीकरण समिती सह छत्रपती शिवशंभू प्रेमी संघटनांची मागणी .
राहुरी येथे मराठा एकीकरण समिती व छत्रपती शिवशंभू प्रेमींनी राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्याकडे पत्र देत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा जुन्या पाण्याच्या टाकीच्या जागेत बसविण्याची मागणी केली आहे.
या प्रसंगी मराठा एकीकरण समितीचे देवेंद्र लांबे,सचिन म्हसे, राजेंद्र उंडे,सतीष घुले,संदीप गाडे, ॲड.अमोल शेळके,ॲड.सुरेश तोडमल सुभाष जुंदरे,सुनील निमसे,सतीश ढोकणे,आबासाहेब शेटे,अनिल चत्तर उपस्थित होते.
याप्रसंगी मराठा बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र लांबे पा.म्हणाले कि, राहुरी शहराजवळ शिर्डी व शिंगणापूर हे प्रसिध्द देवस्थान आहेत.देश विदेशातून येणारे भाविक,पर्यटक हे राहुरी शहरातून जाणाऱ्या महामार्गावरून प्रवास करत असतात,राहुरी शहरात कुठेही “छत्रपती शिवाजी महाराज” यांचा अश्वारूढ पुतळा नाही.राहुरी नगर परिषदेने सुधारित पाणीपुरवठा योजने अंतर्गत नवीन पाण्याची टाकी मुथ्था प्लॉट ,कॉलेज रोड मार्गावर बांधलेली आहे.नगर मनमाड रस्त्याच्या कडेला असलेली जुनी पाण्याची टाकी निष्काशित करण्यात येणार आहे. राहुरी शहरातील जुनी पाण्याच्या टाकी निष्काशित केल्यानंतर त्या मोकळ्या जागेत “छत्रपती शिवाजी महाराज” यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात यावा.जिल्हा नियोजन समिती अ`नगर यांच्या माध्यमातून अ`नगर जिल्ह्याती प्रत्येक तालुक्यात “छत्रपती शिवाजी महाराज” यांचा पुतळा बसविण्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे असे समजते.राहुरी शहरात किंवा परीसरात छ.शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा बसविण्यासाठी जागा नाही त्यामुळे छत्रपती शिवशंभू प्रेमींच्या मागणीची दखल घेवून नगर मनमाड रस्त्याच्या कडेला जुन्या पाण्याची टाकी निष्कासित केल्यानंतर त्याच जागेत भव्य असा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवावा असे श्री.लांबे पा.म्हणाले.निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री तथा नगर विकासमंत्री एकनाथजी शिंदे,पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आलेल्या आहेत.
या प्रसंगी प्रदीप जाधव विजय काकडे अरुण निमसे नारायण धोंगडे, कृष्णा तनपुरे सुभाष पवार सतीश चोथे विजय तोडमल रवींद्र तनपुरे प्रसाद सोनवणे अमित भगत संभाजी मोरे विजय कोहकडे आदेश जाधव दिगंबर कदम शेखर सुडके दिनेश झावरे निखिल कोहकडे, सागर ताकटे धनंजय देशमुख अजय गाडे दिनेश येवले महेंद्र शेळके अशोक तनपुरे अरुण निमसे अविनाश क्षिरसागर मधुकर घाडगे प्रशांत बानकर धनंजय नरवडे काका आढागळे शिवाजी गाडे, रवींद्र कदम विनोद डौले राजेंद्र लबडे,प्रमोद शिरसाठ आदी उपस्थितीत होते.