खेडले परमानंद येथे स. पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामस्थांच्या वतीने शांतता समितीची बैठक संपन्न.
खेडले परमानंद प्रतिनिधी
खेडले परमानद येथे शांतता समितीची बैठक सोनईचे स पो नि माणिक चौधरी यांच्या उपस्थितीत बैठक सोनई
खेडले परमानंद येथे जातीय सलोखा राखण्यासाठी आज सोनई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांची
शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती .
यावेळी गावातील सर्वच जाती-धर्माचे लोक या बैठकीसाठी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक चौधरी म्हणाले की मोबाईल वर येणाऱ्या चुकीच्या गोष्टींचा प्रचार तरुण पिढी मार्फत होत असून त्याचे दुष्परिणाम सामाजिक तेढ निर्माण करण्याला कारणीभूत ठरत आहे.
दुसऱ्या ठिकाणच्या घटनेचा संबंध आपल्या गावाशी जोडून गावातील वातावरण दूषित करणाऱ्या दुष्ट प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी आजची बैठक आयोजित करण्यात आली आहे.. त्याचप्रमाणे ग्राम सुरक्षा दल सक्रिय करून गावातील सुरक्षे संबंधी यंत्रणा तयार करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी गावातील अनेक ज्येष्ठ मंडळींनी त्यांचे गावातील संबंध कसे होते व कसे टिकवण्यासाठी प्रयत्न करावे यासाठी आपले अनुभव सांगत मार्गदर्शन केले.
खेडले परमानंद या गावात अनेक जाती धर्माचे लोक वास्तव्य करीत असून अगदी एका विचाराने राहत आहे यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक चौधरी म्हणाले की खेडले परमानंद या गावात वाद-विवाद हे अतिशय कमी प्रमाणात असतात व जरी असले तरी ते चर्चेतून मार्गी लागतात.
या गावातील तंटामुक्ती चे काम अतिशय सक्रिय असून गावातील प्रश्न गावातच मार्गी लागतात.
या कार्यक्रमाला गावातील सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित होते
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक माणिक चौधरी ,सेवानिवृत्त सैनिक राजेंद्र राजळे, सूर्यभान आघाव, तंटामुक्ती अध्यक्ष दागुबाबा हवालदार, ग्रामसेवक धनाजी फरताडे , तलाठी चंद्रकांत नवाळे, कृषी सहाय्यक प्रगती रौंदळ , समाजसेवक पत्रकार संभाजी शिंदे ,फकीर मोहम्मद हवालदार
सुभाष राजळे, दादासाहेब तूवर, प्रल्हाद अंबिलवादे, सेवानिवृत्त सैनिक लतीब इनामदार, मुनीर इनामदार, काशिनाथ तुवर, माऊली तुवर, विजय शिंदे , एकनाथ ब्राह्मणे ,किशोर केदार , ,सुभाष राजळे , नितीन मोकाशी, अजित इनामदार, आलु इनामदार ,
अशोक शिंदे ,योगेश वैरागर ग्रामपंचायत सदस्य रमेश बनकर,कुंडलिक बर्डे मोहम्मद इनामदार ,श्यामसुंदर केदारी ,प्रशांत केदारी ,नानासाहेब केदारी ,प्रशांत तुवर ,बाळासाहेब ब्राह्मणे
रमेश राजळे ,भाऊसाहेब राजळे, चांगदेव गोसावी बाळासाहेब गोसावी
ओंकार राजळे, नानासाहेब केदारी, योगेश वैरागर, छबु वैरागर ,कृष्णा राऊत , राहुल भुजबळ, संदीप केदारी आदी युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.