नेवासा तालुक्यातील चांदा येथे अवैध व शस्त्र बाळगणारा आरोपी सोनई पोलिसांच्या ताब्यात.
प्रतिनिधी:- संभाजी शिंदे ,खेडले परमानंद
वाढती गुन्हेगारी व गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी विशेष मोहिमेअंतर्गत रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा तपास करण्यासाठी व त्यांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी अवैध अग्निशस्त्र विरुद्ध मोहीम राबवली आहे.
या मोहिमेअंतर्गत तपास करत असताना, नेवासा तालुक्यातील चांदा येथील शास्त्रीनगर या ठिकाणी तपासादरम्यान अशोक उत्तम फुलमाळी (वय २१) याच्या राहत्या घरात सर्च वॉरंट च्या आधारे झडती घेतली असता.
या इसमाकडे २५००० रुपये किमतीचे देशी बनावटीचे गावठी पिस्तूल म्हणजेच गावठी कट्टा सापडला.
या पिस्तुलावर दोन्ही बाजूनी लाल रंगाची धातूची प्लेट लावलेले असून त्यावर U.S.A असा सिम्बॉल आहे. या पिस्तुलाच्या मॅगझिनमध्ये २०० किमतीचे जिवंत काडतुस सापडले असून त्याच्या मागील गोलाकार भागावर KF ७.६५ असे लिहिलेले आहे. २५,०२०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर आरोपी वर अवैध अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल अनंता गायकवाड यांनी सोनई पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार १७१/२०२२ भारतीय शस्त्र अधिनियम कायदा१९५९ च्या कलम ३/२५,७/२५ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सदर आरोपी अशोक उत्तम फुलमाळी याच्याविरुद्ध यापूर्वी सोनई पोलीस ठाण्या मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर१६०/२०२१ आर्म एक्ट कायदा ३/२५,७/२५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक उमेश पतंगे ,सोनई पोलीस ठाणे हे करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, पोलीस उपाधिक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे, पोलिस हेडकॉन्स्टेबल विठ्ठल थोरात, पोलीस कॉन्स्टेबल सचिन डोंबरे, मृत्युंजय मोरे, तमनर, जावळे, आघाव, महिला पोलीस कॉन्स्टेबल कमल आघाव, मनीषा नरोटे, बेबी गोरे,पोलीस कॉन्स्टेबल चालक सुनील ढोले यांच्या पथकाने केली.
वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सदरची कारवाई ही गुन्हेगारांसाठी जरब बसवणारी आहे.