घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींना सोनई पोलिसांनी तात्काळ केले जेरबंद.

घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींना सोनई पोलिसांनी तात्काळ केले जेरबंद.

खेडले परमानंद वार्ताहर

      दिनांक ११ ऑगष्ट

           याबाबत सविस्तर वृत्तांत असा आहे की दिनांक ९ /८/ 2023 रोजी

रात्री साडेबाराच्या दरम्यान खरवंडी रोड सोनई येथील शोभा होंडे यांच्या राहत्या घराची अज्ञात चोरट्याने घरफोडी करून रोख रक्कम सोन्याचे दागिने एलसीडी टीव्ही असा एकूण एक लाख नव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला.

        सदर गुन्हाच्या तपासाच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना गुप्त खबऱ्या मार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा अजय विजय वैरागर रा सोनई व त्याच्या साथीदाराने केल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी तपास पथकाला या संबंधीच्या सूचना दिल्यानंतर स्वामी विवेकानंद चौकात तपास पथकाने सदर आरोपस अटक केले व ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला हजर केले.

       गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्याकडे कसुन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

      त्याच्यासोबत त्याचा साथीदार १)रोहित सुरेश थोरात २)संजय नितीन वैरागर३)सचिन मोहन काकडे,सर्वजण राहणार सोनई

यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी घरफोडी करून चोरून नेलेला एलसीडी टीव्ही,१४०० रु रक्कम त्यांच्याकडून जप्त करण्यात आली.

      गुन्ह्याचा पुढील तपास सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार राख हे करीत आहेत