नेवासे पोलिसांचा विक्रम, घरफोडी जबरी चोरी व मोबाइल चोरीच्या गुन्ह्यातील अट्टल आरोपी पोलिसांच्या जाळ्यात.

नेवासे पोलिसांचा विक्रम, घरफोडी जबरी चोरी व मोबाइल चोरीच्या गुन्ह्यातील अट्टल आरोपी पोलिसांच्या जाळ्यात.

प्रतिनिधी:- नेवासा, नगर

जबरी चोरी आणि विविध गुन्ह्यातील अट्टल आरोपी कृष्ण नारायण भोसले. राहणार नागफनी शिवार तालुका नेवासा या 19 वर्षीय तरुणास गोंडेगाव शिवारात दरोड्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेले असताना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवला असता. त्याने त्याच्या साथीदारांची नावे सांगितली. नारायण छगन भोसले, बॉक्सर काळे, स्वस्तिक तेरुलाल चव्हाण, कंलीस नेरुलाल चव्हाण, असे फरार असलेल्या त्याच्या साथीदारांची नाव सांगितले. नेवासा पोलिसांकडून त्यांचा शोध चालू आहे.

    आरोपी कृष्णा भोसले याच्यावर नेवासा पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हा रजिस्टर नं १२/२०२२ भा द वि ३७९

१७/२०२२ भा द वि कलम ३९५, गुन्हा रजिस्टर नं३२/२०२२ नुसार भादवि कलम३९९, गुन्हा रजिस्टर नं८८/२०२२ नुसार भा द वि कलम३९२,४५७,३८०, गुन्हा रजिस्टर नं९२/२०२२ नुसार भादवि कलम४५७,३८० असे अनेक गुन्हे दाखल आहेत.

          सदर गुन्ह्याबाबत ची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर उपाधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलिस उपाधीक्षक श्रीरामपूर स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे शेवगाव, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार नेवासा, या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटे वाला, पोलीस कॉन्स्टेबल अंबादास गीते, पोलीस कॉन्स्टेबल केवल राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल गणेश इथापे, पोलीस कॉन्स्टेबल आप्पासाहेब तांबे आशा धडाकेबाज पोलीस पथकाने सदर गुन्ह्याबाबत कारवाई केली आहे.

       वाढत्या गुन्हेगारीला दरोडे चोऱ्या, व दरोडया दरम्यान होणाऱ्या घातपातांना अशा प्रकारच्या पोलीस कारवाईमुळे नक्कीच जरब बसेल.