दोन वर्षाच्या खंडानंतर धामोरी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात सुरुवात.
प्रतिनिधी:- नेवासा
श्रीक्षेत्र देवगड व काल भैरव नाथाची बहिर वाडी या दोन्ही तीर्थक्षेत्राच्या मधोमध प्रवरामाई च्या काठावर वसलेले सुंदर व अध्यात्मिक ओळख असलेले मौजे धामोरी गाव येथे दोन वर्षाच्या कोरणा खंडा नंतर श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा यांच्या आशीर्वादाने व महंत हरिभक्त परायण भास्कर गिरी जी महाराज यांच्या प्रेरणेने अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली पहाटे चार ते सहा काकडा सकाळी सात ते ज्ञानेश्वरी पारायण संध्याकाळी चार ते पाच रामायण कथा सायंकाळी पाच ते सात हरिपाठ व रात्री साडेआठ ते साडेदहा हरिकीर्तन त्यानंतर जागर व सकाळ संध्याकाळ अन्नदान असे दिवसभराचे अखंडित कार्यक्रम दिनांक 6 मार्च ते 13 मार्च या कालावधीत चालू आहे दिनांक 13 मार्च रोजी सकाळी नऊ ते अकरा या कालावधीत गुरुवारी शांतिब्रह्म हभप गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांचे काल्याचे किर्तन आणि सप्ताहाची सांगता होणार आहे त्यानंतर महाप्रसाद उत्तम सर्जेराव पटारे बाळासाहेब नामदेव प टारे संजय तुकाराम प टारे
चागदेव नारायण वरखडे दिगंबर नारायण वरखडे यांचा होईल. अशा प्रकारे सात दिवसाचे धार्मिक कार्यक्रम होणार आहे तरी सर्व कार्यक्रमाचा परिसरातील भजनी मंडळ व भक्तमंडळी लाभ घ्यावा असे आव्हान ग्रामस्थ मंडळ धामोरी यांच्याकडून करण्यात आले आहे सप्ताहसाठी विशेष सहकार्य किसन गिरी बाबा तरुण मंडळ व ग्रामपंचायत सदस्य गणेश पटारे ,प्रदीप प टारे ,गोविंद दाणे सतीश
पटारे .संदीप पटारे रामकिसन पटारे रमेश घोरपडे आदिनाथ पटारे.सुनील घोरपडे भारत पटारे किशोर जमधडे. नवनाथ पटारे.राजू जमधडे मुकुंद पटारे.पोपट वरखडे, किशोर पटारे. बन्सी पटारे.विठ्ठल वरखडे. कडूबाळ पटारे, किशोर घोरपडे,रामनाथ पटारे लखन पटारे आदी ग्रामस्थांचे सप्ता साठी विशेष योगदान आहे