खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे महा पावन गणपती व बालाजी मंदिर देडगाव या तीर्थक्षेत्राकरिता खासदार निधीसाठी ग्रामस्थांची मागणी.

खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे महा पावन गणपती व बालाजी मंदिर देडगाव या तीर्थक्षेत्राकरिता  खासदार  निधीसाठी ग्रामस्थांची मागणी.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील देडगाव व माका शिवा वरील महा पावन गणपती या देवस्थानसाठी सांस्कृतिक भवन व श्री क्षेत्र बालाजी मंदिर देडगाव याकरिता पेव्हींग ब्लॉक या कामाची मागणी देडगाव ,तेलकुडगाव ,महालक्ष्मी हिवरा, पाचुंदा, माका ग्रामस्थांकडून करण्यात आली.

         खासदार निधितून या मंदिरास भरपूर निधी मिळावा यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी जाऊन शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या कार्यालयात तीर्थक्षेत्र विकास कामाबद्दल निवेदन दिले.

      यावेळी खासदार सदाशिव लोखंडे साहेब म्हणाले की ,लवकरात लवकर हा देवस्थानला निधी देऊन लवकरच या कामाची सुरुवात होईल .असे आश्वासन दिले. त्याबद्दल त्यांचे देडगाव, माका ,तेलकुडगाव ,महालक्ष्मी हिवरा ,पाचुंदा ग्रामस्थांनी अभिनंदन करत खासदार सदाशिव लोखंडे यांचा सन्मान केला.

       यावेळी नेवासा माजी सभापती भगवानराव गंगावणे, पाचुंदा सोसायटीचे चेअरमन माणिकराव होंडे, देडगाव चे विद्यमान सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे, तेलकुडगाव चे विद्यमान सरपंच सतिश काळे, युवा नेते माऊली काळे, मलोजी गटकळ, शिवसेनेचे नेते बाळासाहेब पवार , बालाजी देवस्थानचे विश्वस्त सुभाष मुंगसे ,पावन गणपतीचे तज्ञ विश्वस्त अशोकराव मुंगसे, प्रगतशील बागातदार शेतकरी बन्सी पाटील मुंगसे आदी मान्यवर उपस्थित होते.