केंद्र व राज्य सरकारने शेतक-यांना किमान हे.75 हजार तर शेतमजुरांच्या कुटुबांस 20 हजार मदत त्वरीत द्यावी =सुरेशराव लांबे पाटील .
गेल्या अनेक महिन्यापासुन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सतत मोठ्या प्रमाणात पाऊस चालू असून परतीच्या पावसांमंध्ये संपुर्ण राहुरी तालुक्यात व राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात ठग फुटी पाऊस होऊन शेतकऱ्यांचे खरीपातील सोयाबीन कपाशी कांदा,फळबागा व जनावरांचे चारा पिके संपुर्ण उपळुन गेली आहे,तर मुख्य पिक असलेल्या उसालाही मोठ्या प्रमाणात हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने मोठे नुकसान झाले,तशातच सततच्या पावसामुळे शेतमजुरांनाही हाताला काम नाही, गेल्या सप्टेंबर महिन्यात आम्ही शासनाकडे सरसकट पंचनामाची मागणी केली असता अजूनही मिरी करंजी गट व अनेक गावांमध्ये समाधानकारक पंचनामे झालेले नाहीत व शासनाने जाहीर केलेली कुठलीच मदतही अद्यापही कोणत्याच शेतकऱ्याला मिळाले नाही तरी शासनाने राहिलेले पंचनामे सरसकट करून शेतक-यांना किमान हेक्टरी 75 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी व शेतमजुरांना प्रत्येक कुटुंबाला 20 हजार त्वरीत द्यावेत व ओला दुष्काळ जाहीर करुन शेतीमालाला हमी भाव द्यावा व शेतकऱ्यांची व शेतमजुरांची दिवाळी गोड करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुका अध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी केली,
निवेदनात लांबे यांनी शेतकऱ्यांची व शेतमजुरांची चालु असलेली परस्तीती मांडताना सांगीतले देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे झाली तरी सुद्धा आपल्या असलेल्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र व निवारा याही भागवणे त्यांना शक्य होत नाही,त्यातच गेली दोन वर्षापासून अतिवृष्टी कोरोना या सर्व परिस्थितीमध्ये शेतकरी व शेतमजुर यांच्यावर आत्महत्येची वेळ आलेली आहे, अशातच चालु वर्षी अनेक महीन्यापासुन मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे, सततच्या पावसामुळे हातात तोंडाशी आलेली शेतक-यांची खरीपातील सर्व पिक हे उपळुन गेली आहे,व शेतमजुरांनाही सततच्या पावसामुळे हाताला काम नाही,त्यातच दिवाळी सारखा मोठ्या सनाला कपडे,किराणा,लहान मुलांचे समाधान करन्यासाठी फटाके या सर्व आवशक वस्तुसाठीही कुनाकडेच पैशे नाहीत,तरी शिंदे फडणवीस सरकारने नुसत्या घोषणा करन्यापेक्षा सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 75 हजार रुपये,व शेतमजुरांना प्रत्येक कुटुंबाला 20 हजार मदत त्वरीत करावी व सर्वाची दिवाळी गोड करावी,तसेच महाराष्ट्रामंध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुका अध्यक्ष सुरेशराव लांबे यांनी केली,