आव्हणे बु निद्रिस्त गणपती येथे संकष्टी चतुर्थी निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन .

आव्हणे बु निद्रिस्त गणपती येथे संकष्टी चतुर्थी निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन .

आव्हाणे बु.निद्रिस्त गणपती येथे संकष्टीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन. 

 

 

 

आव्हाणे बु :- शेवगाव तालुक्यातील गणपती आव्हाणे बु .येथे शनिवार ११ रोजी संकष्टी चतुर्थी निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

     सकाळी ठिक ७ वा . पैठण वरून आणलेल्या गंगेच्या पाण्याने श्रींची आरती व महाभिषेक संदीप पठाडे व गणेश काकडे यांच्या हस्ते होणार असून दु . १२ वा . भाविकांना फराळाची व्यवस्था संदीप पठाडे व गणेश काकडे यांच्यावतीने करण्यात आली आहे. सायं ६ वा .ह .भ.प. त्रिंबक महाराज बोरूडे यांचे हरीकिर्तन होईल सायं ७ वा . श्रीींची आरती व महाभिषेक सुभाष आहेर (आव्हाणे खुर्द) ता शेवगांव यांच्या हस्ते होणार आहे. रात्री ९ वा .भाविक भक्तासाठी सुभाष आहेर यांच्यावतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. रात्री १० वा .आव्हाणे पंचक्रोशीतील भजनी मंडळ व दादोबा देव भजनी मंडळीचा जागराचा कार्यक्रम होईल तरी या धार्मिक कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन निद्रिस्त गणपती आव्हाणे ट्रस्टचे अध्यक्ष मालोजीराव भुसारी ,सरचिटणीस अर्जुनराव सरपते यांनी केले आहे.