कोथरूडमध्ये दलित मुलींवर अत्याचार प्रकरण : ६ पोलीसांसह ८ जणांवर गंभीर गुन्हे; वंचित बहुजन आघाडीचा ठाम लढा

कोथरूडमध्ये दलित मुलींवर अत्याचार प्रकरण : ६ पोलीसांसह ८ जणांवर गंभीर गुन्हे; वंचित बहुजन आघाडीचा ठाम लढा

कोथरूडमध्ये दलित मुलींवर अत्याचार प्रकरण : ६ पोलीसांसह ८ जणांवर गंभीर गुन्हे; वंचित बहुजन आघाडीचा ठाम लढा

प्रतिनिधी // प्रसाद घोगरे - ९३७०३२८९४४.

कोथरूड परिसरात दलित मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाने पुन्हा एकदा पोलिस यंत्रणेमधील गैरप्रकार आणि सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. वर्दीचा धाक दाखवत दलित मुलींवर अत्याचार, विनयभंग, अपहरण, अवैध घुसखोरी आणि दरोडा अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी झाल्याच्या आरोपांनंतर ६ पोलीसांसह एकूण ८ जणांविरोधात अॅट्रॉसिटीसह कडक कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणात सुरुवातीला प्रशासन आणि मुख्य प्रवाहातील पक्षांनी कोणतीही ठोस भूमिका घेतल्याचे दिसून आले नाही. तथाकथित उजव्या विचारसरणीच्या पक्षांनी तर या गंभीर मुद्द्यावर एकही प्रतिक्रिया दिली नाही, एवढेच नव्हे तर लक्ष देण्याचीही तसदी घेतली नसल्याचे चित्र स्पष्ट होते.

याउलट, वंचित बहुजन आघाडीने वॉर्ड पातळीपासून थेट नेतृत्वापर्यंत भक्कम लढा उभारत या प्रकरणाला न्याय देण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. सुजात आंबेडकर आणि अंजलीताई आंबेडकर यांनी थेट पोलीस स्थानकात ठिय्या देत, आरोपींवर तत्काळ कारवाईची मागणी करत पोलिस प्रशासनाला जबाबदार धरण्याची कणखर भूमिका घेतली. त्यांच्या आंदोलनानंतरच या प्रकरणावर अधिकृत कारवाईला वेग आला.

ही संपूर्ण घटना पुन्हा एकदा सिद्ध करते की सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्या पक्षांची आणि नेतृत्वाची गरज आजही तितकीच तीव्र आहे. अत्याचारग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी केवळ घोषणाबाजी नव्हे, तर प्रत्यक्ष पातळीवर उभे राहून संघर्ष करणारे नेतृत्वच निर्णायक ठरते, हे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.

स्थानिक नागरिकांनीही या घटनेचा तीव्र निषेध करत आरोपींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी केली असून पुढील तपास सुरू आहे.