रोडवर कांदा फेकत बळीराज्य संघटनेच्या वतीने केंद्र शासनाचा जाहीर निषेध.
बालाजी देडगाव :- (प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील बळीराज्य संघटनेच्या वतीने अध्यक्ष मच्छिंद्र पाटील मुंगसे व परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने केंद्र सरकारच्या निर्णयाचा जाहीर निषेध करण्यात आला. या शेतकऱ्याच्या विरोधातील निर्णयाची होळी करण्यात आली आहे.
नेवासा तालुक्यातील शेतकऱ्याची बळीराज्य संघटना आक्रमक होत कांद्याबाबत निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनी या केंद्र शासनाचा तीव्र शब्दात व घोषणा देत जाहीर निषेध करण्यात आला. जिल्हाभर होत असलेल्या आंदोलनामध्ये बालाजी देडगाव येथील मच्छिंद्र पाटील मुंगसे यांनी पुढाकार घेत हे आंदोलन छेडले आहे . रोडवर कांदे फेकत तीव्र प्रतिक्रिया दिल्या .हा निर्णय मागे घ्या अन्यथा बळीराज्य संघटना रोडवर उतरेल असा इशारा यावेळी देण्यात आला. या केंद्र सरकारचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहे.
यावेळी बळीराजा संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र पाटील मुंगसे व युवा नेते निलेश कोकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करत .केंद्र शासनाच्या या निर्णयाचा जाहीर निषेध करत घोषणा दिल्या . उपस्थित मान्यवरांनी हातात निषेधाचा फलक घेऊन निषेध नोंदवला.
यावेळी मच्छिंद्र मुंगसे बोलताना म्हणाले की ,शेतकरी आधीच अवकाळी पावसाने संकटात आहे व यावर्षी कांद्याचे अतोनात नुकसान झाले आहे. व सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यावर आत्महत्याची वेळ आली आहे .परंतु या केंद्र सरकारची मनमानी चालून देणार नाही या केंद्र शासनाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा परखड इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी चेअरमन बाबासाहेब मुंगसे ,ज्येष्ठ नागरिक काशिनाथ टकले ,बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, सूर्यभान सोनवणे भाऊसाहेब, कडूभाऊ दळवी, संजय मुंगसे, अशोक मुंगसे, भीमराव मुंगसे, रामनाथ गोयकर ,रंगनाथ कोकरे, बाळासाहेब कुटे , माजी. चेअरमन बन्सी कुटे, एकनाथ आव्हाड, पिणू काळे व बळीराजा
संघटनेचे पदाधिकारी व देडगाव परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.