कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त संत रोहिदास महाराज देवस्थानं येथे महाआरतीचे आयोजन.
कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त संत रोहिदास महाराज देवस्थानं येथे महाआरतीचे आयोजन
.
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री संत रोहिदास महाराज मंदिरामध्ये महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. ह्या पौर्णिमेचे विशेष महत्त्व आहे महिलांनी दिवे लावून हा उत्साह साजरा करायचा असतो या देशात सर्व जाती-धर्माचे लोक राहतात आम्ही सर्व एक आहोत याचे प्रतीक क मानले आहे म्हणून रोहिदास देवस्थान येथे यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्री संत रोहिदास महाराजांची महाआरती करण्यात आली. तसेच उध्दव देवा तांदळे यांच्या हस्ते श्री संत रोहिदास महाराजांची विधीवत पूजा करण्यात आली.
यावेळी संत रविदास देवस्थानचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, बालाजी देवस्थानचे विश्वस्त सोपानराव वांढेकर, पत्रकार युनूस पठाण,उद्धव देवा तांदळे, श्री. वांढेकर, छबुबाई लाड, मंदाबाई एडके, माया आष्टेकर आदी उपस्थित होते.