बेपत्ता झालेल्या मुलीचा शोधाकरिता पालकांचे आमरण उपोषण. .! !
श्रीरामपूर (प्रतिनिधी)श्री
रामपूर शहरा नजीक असणाऱ्या शिरसगाव या गावातील मुलगी सुमारे गेल्या दोन महिन्या पासून बेपता झालेली असून तिचा शोध सर्व ठिकाणी घेऊन देखील ती अद्यापही मिळून आलेली नाही. वेळोवेळी तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात मुली विषयी विचारणा केली असता पोलिसांकडून समाधान कारक उत्तरे मिळत नसल्याचे बोलले जात आहे.
शिरसगाव भागातील 18 वय वर्ष असणाऱ्या या मुलीला एका अज्ञात इसमाने कसली तरी आमिष देऊन फूस लावून पळून नेल्याचे बोलले जात आहे. मुलीला घेऊन बेपत्ता असलेला सदर आरोपीचा अजूनही तपास लागलेला नाही म्हणून मुलीचे वडील राजेंद्र सिताराम लांडगे यांनी गांधी पुतळा श्रीरामपूर या ठिकाणी आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले होते. सदर मुलीच्या वडिलांनी उपोषणास बसू नये याकरीता श्रीरामपूर पोलीस स्टेशनच्या मध्यस्थीने श्रीरामपूर पोलीस स्टेशन चे प्रमुख पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मदतीने उपोषण करणाऱ्या मुलींच्या पालकांना विश्वासात घेऊन तपासामध्ये कुठलीही दिरंगाई होणार नाही याची ग्वाही दिली. त्यामुळे सदरील उपोषण मागे घेण्यात आले.या उपोषणासाठी उपस्थित असलेले कार्यकर्ते शिरसगाव ग्रामपंचायतचे सरपंच आबासाहेब गवारे तसेच अशोक नाना कानडे भाजपाचे सरचिटणीस प्रकाश चित्ते ,सचिन घावटे ,शोभा लांडगे, जिजाबाई घावटे,भाजपाच्या महिला अध्यक्ष पुष्पा हारदे,राजू साळवे,गणेश मुदगुले,संतोष मोकळ,प्रकाश मेहत्रे,गणेश सिनारे,रोहित यादव, दिनकर यादव,माऊली मुरकुटे इतर सर्व मान्यवर या वेळी उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेण्यात आले.! !
( प्रतिनिधी - दिपक कदम.बी.पी.एस.न्यूज श्रीरामपूर )