खेडले परमानंद स्मशानभूमीच्या प्रश्नाबाबत लक्षवेधी निवेदन जिल्हा परिषद सदस्य मा. सुनील गडाख यांच्याकडे देण्यात आले.

खेडले परमानंद स्मशानभूमीच्या  प्रश्नाबाबत लक्षवेधी निवेदन  जिल्हा परिषद सदस्य मा. सुनील  गडाख यांच्याकडे देण्यात आले.

खेडले परमानंद स्मशानभूमी संदर्भात जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख यांना निवेदन .

               खेडले परमानंद ग्रामपंचायत सदस्य नितुताई मोकाशी तंटामुक्ती अध्यक्ष दगु बाबा हवालदार व गावातील महिला वर्ग यांच्या संयुक्त विद्यमानने जिल्हा परिषद सदस्य अर्थ व पशुसंवर्धन विभाग मा.सुनील गडाख यांना निवेदन देण्यात आले.

       या निवेदनात असे नमूद करण्यात आले की सद्यस्थितीत असलेल्या स्मशानभूमीत शिरेगाव येथे मुळा नदीवर असलेल्या बंधाऱ्याचे बॅकवॉटर असते.

त्यामुळे स्मशानभूमी असूनही अंत विधी करता येत नाही. ही गोष्ट गांभीर्याने लक्षात घेता, हा प्रश्न खूप मोठा आहे. म्हणून स्मशानभूमीच्या कडेला तटबंदी देऊन त्याची उंची वाढवण्यात यावी त्याचप्रमाणे जवळच उपलब्ध असलेल्या जागेवर दशक्रिया विधी साठी ब्लॉक बसून सदर जागेचे सुशोभीकरण करण्यात यावे अशा मागणीचा प्रस्ताव खेडले परमानंद येथील महिलावर्ग यांच्यावतीने मा. सुनील गडाख यांना देण्यात आला. त्यावर त्यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर जुन 2022 पर्यंत संपूर्ण कामाचा आराखडा व अंमलबजावणी होईल असे आश्वासन दिले.

            यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष दगू बाबा हवालदार, ताहिरा हवालदार,ग्रामपंचायत सदस्य नीतु ताई मोकाशी, मिना जाधव, राधिका गुरसाळ, पुष्पा गोसावी, संगीता पवार, योगिता गोसावी, वैशाली केदारी, आदि महिलावर्ग यांच्या हस्ते हे निवेदन देण्यात आले.