३ जुलै प्रेषित संत थॉमस स्मृतिदिन व येशू भक्ती दिवस साजरा.
श्रीरामपूर :- दि. ०३/०७/२०२४ चर्च मधील सकाळच्या भक्ती नंतर सेंट थॉमस यांचे तैलचित्रास रेव्ह फा फ्रांको व रेव्ह फा शिजो यांचे हस्ते पुष्पहार घालून स्मृतीदिन साजरा केला. तसेच आज येशू भक्ती दिवस असल्याने डी पॉल शाळेचे मॅनेजर व डी पॉल पब्लिक स्कूलचे प्रिन्सिपल रेव्ह फा शिजो यांचा सत्कार श्री. अविनाशजी काळे यांनी शॉल व पुष्प गुच्छ देवून सन्मानित केले व नव्यानेच हजर झालेले अॅडमिनीस्ट्रेटर रेव्ह फा फ्रांको यांना रिटायर पी एस आय मेजर श्री मकासरे यांनी शॉल व पुष्प गुच्छ देवून सन्मानित करण्यात आले तसेच सि सेलिना, सिस्टर दिप्ती व इतरही सर्व सिस्टर्स यांना स्टॉल व गुलाब पुष्प देवून सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी श्री अविनाशजी काळे यांनी सेंट थॉमस यांचे सन ५२ मध्ये केरळ प्रांतात आल्या पासून सन ७२ पर्यंत च्या प्रेशितीय कार्याबद्दल थोडक्यात माहीती सांगितली या प्रसंगी दिपक कदम, जॉन सर, प्रकाश निकाळे सर , बी एस कांबळे सर, पावसे, गायकवाड, सचिन दिवे, तोरणे, खरे व इतर ख्रिस्ती बंधू भगिनी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी रेव्ह फादर्स व सिस्टर्स यांना तसेच एकमेकांना स्मृतिदिनानिमित शुभेच्छा दिल्या. रेव्ह फा शिजो यांनी प्रेषित थोमस बाबतीत माहिती सांगुन सण साजरा केल्या बद्दल सर्व उपस्थित भाविकांचे आभार मानले तर या छोट्याशा कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री दिपक कदम यांनी केले.