माहिती अधिकार कार्यकर्ते सोपान रावडेंवरील खोटा ॲट्रॉसिटी गुन्हा मागे घेण्यासाठी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष कृष्णा गायकवाड यांनी तहसिलदारांना दिले निवेदन .
जिल्हा अहमदनगर नेवासा तालुक्यातीली कांगोणी गावचे रहिवासी तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते सोपान रावडे यांच्यावर खोटा ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे . हा खोटा गुन्हा मागे घेण्यासाठी तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवणाऱ्या गावगुंडांना व त्यांना सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा गायकवाड ,उपजिल्हाध्यक्ष सचिन पवार , जिल्हा प्रवक्ता आर . आर . जाधव व उपस्थित कार्यकर्ते यांच्या वतीने राहुरी येथील तहसीलदार मा . फसियोद्दीन शेख यांच्या मार्फत जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर यांना निवेदन देण्यात आले आहे .
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुका हा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून नेहमीच चर्चेत आला आहे .या भ्रष्टाचाराच्या विरोधात माहिती अधिकार कार्यकर्ते सोपानरावडे यांनी प्रशासकीय यंत्रणे विरोधात सध्या चालू असलेला भ्रष्टाचार बाहेर काढला .या प्रकरणाविषयी त्यांनी वेळोवेळी आंदोलने केली .त्यांच्या या आंदोलनामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन कारवाई करण्याचे पोकळ आश्वासन दिली परंतु प्रत्यक्षात कारवाई झाली नाही ,त्यामुळे सोपान रावडे यांनी हवा सोडून आंदोलन चालू केले .त्यांच्या गावातच एका शिक्षकाच्या वाहनातील हवा सोडण्याचे काम आंदोलनामार्फत केले गेले .याचा राग आल्याने शाळेमध्ये पालक मेळावा घेऊन सरपंच व शिक्षक यांनी जमलेल्या पालकांना रावडे यांच्या विरोधात भडकावून दिले .हा राग मनात धरून गावातील शंभर ते दीडशे जणांच्या टोळक्याने रावडे यांच्या कुटुंबावर हल्ला चढवला व त्यांना मारहान करण्यात आली .रावडेंनी चालू केलेली आंदोलन दडपण्यासाठी व त्यांचा आवाज दाबण्यासाठी हे सर्व षडयंत्र रचले गेले .रावडे यांचा आवाज बंद करण्यासाठी राजकीय व शासकीय स्तरावरून पूर्ण प्रयत्न करण्याचे काम चालू आहे .
सध्या सोपान रावडे हे समाज जागृत करण्याचे काम व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचार उघडकीस आणल्याचे फळ म्हणून सध्या ॲट्रॉसिटी या गुन्ह्यात जेल भोगत आहेत .भ्रष्टाचार करणारे पुढारी व शासकीय कर्मचारी यांना माहिती अधिकार हा कायदा त्रासदायक होत आहे .एखाद्या व्यक्तीने माहिती अधिकार कायद्याचा वापर करून माहिती मागितली तर त्या विरोधात सर्व यंत्रणा जागृत होते व त्याचे खच्चीकरण करण्यास प्रयत्न चालू होतात किंवा त्याच्या जीवालाही धोका होतो असे जर होत असेल तर होणारा भ्रष्टाचार हा बाहेर काढायचा कसा असा प्रश्न उपस्थित होतो .
सोपान रावडे यांच्यावर होणाऱ्या अन्याया विरोधात प्रत्येक जिल्ह्यातून स्वराज्य पोलीस मित्र माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटना सहित विविध संघटना आता मैदानात उतरू लागल्या आहेत. रावडेंवर दाखल झालेल्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याचा सखोल तपास करून खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या विरोधात तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा सर्व संघटनांच्या रोशाला सामोरे जाण्याची शासनाने तयारी ठेवावी असे या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत सांगण्यात आले आहे .