श्रीरामपुर मध्ये हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीची भव्य मिरवणूक...मिरवणुकीमध्ये सर्व धर्म समभाव एकतेचे दर्शन

श्रीरामपुर मध्ये हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीची भव्य मिरवणूक...मिरवणुकीमध्ये सर्व धर्म समभाव एकतेचे दर्शन

श्रीरामपूर ( प्रतिनिधी )
श्रीरामपूर शहरा मध्ये धार्मिक महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात या महोत्सवांमध्ये सर्वधर्म समभाव दिसून येतो.असाच एक महोत्सव श्रीरामपूर मध्ये मोठ्या उत्साहात आज साजरा होत आहे. हजरत मोहम्मद साहब पैगंबर यांचा जन्मदिन ईद ए मिलादुन्नबी म्हणून शहरात मोठया उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमिताने आज शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात हजारो मुस्लीम बांधव सामिल झाले होते .सकाळी १० वाजता सय्यद बाबा चौकातून मिरवणुकीस प्रारंभ झाला .मौलाना आजाद चौक , गुलशन चौक ,मिल्लत नगर ,फातेमा कॉलनी , काजीबाबा रोड ,पापाभाई जलाल रोड ,जमात खाना मार्गे मिरवणुकीची जामा मशिदीत सांगता झाली .मिरवणुकी मध्ये  अग्रस्थानी मौलाना मोहमद ईमदादअली व ईतर मौलवीगण रथात विराजमान होते .डिजेवर नाअत पठन सुरू होते. मिलाद पठन करणारे पथक ही मिरवणुकीत होते.मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी महाप्रसाद रुपाने मिठाई व विविध खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले .मिरवणूक मार्गावर चौका चौकात ध्वनिक्षेपकावर नाअत पठण केले जात होते.
मिरवणुकीची सांगता जामा मशिदीच्या मागील पटांगणात झाली. त्या ठिकाणी माजी नगराध्यक्षा अनुराधाताई  आदिक,उपनगराध्यक्ष करण ससाणे, ज्ञानेश्वर मुरकुटे,अशोक नाना कानडे, नगरसेवक अंजूमभाई शेख , मुजफ्फर भाई शेख, मुख्तार शाह , युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे, कलीम कुरेशी , प्रकाश ढोकणे,मुन्ना पठाण , रज्जाक पठाण , रियाज पठाण , तौफीक शेख, शकूर शेख अर्चना पानसरे यांच्यासह शहरातील अनेक हिंदू-मुस्लिम नागरिक या मिरवणुकीमध्ये सामिल झाले होते.पोलीस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.