कोळसेवाडी , कल्याण मुंबई येथील दरोडाच्या गुन्ह्यातील फरार असलेले आरोपी राहुरी पोलीसानी केले जेर बंद
राहुरी ता प्रती - डॉ देवेंद्र शिंदे 27/02/2026
*कोळसेवाडी पोलीस स्टेशन कल्याण येथील दरोड्यातील तीन आरोपी ह्यांना राहुरी पोलीस स्टेशन कडील अमलदार यांनी पाठलाग करून सीताफिने घेतले ताब्यात*
दिनांक 26/02/2026 रोजी राहुरी पोलीस स्टेशन कडील पोलीस हवालदार शकूर सय्यद, PN प्रविण अहिरे, PC नदीम शेख,pc प्रमोद ढाकणे,pc सचिन ताजने असे रात्री 21.00 वाजता राहुरी शहरात सरकारी वाहनाने पेट्रोलिंग करत असताना राहुरी पोलीस स्टेशन कडील PC प्रमोद ढाकणे यांना कोळसेवाडी पोलीस स्टेशन कल्याण येथील HC विशाल वाघ यांचा फोन आला त्यांनी कळवले की, कोळसेवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 103/2026 BNS कलम 309(४)(६),204 प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे 1) उमाशंकर हनुमान प्रसाद पांडे उर्फ पप्पू व 51 वर्ष राहणार सेट जोसेफ स्कूलच्या पाठीमागे उल्हासनगर, 2) शरद कुमार मोहन व 46 वर्ष राहणार पिंटू पार्क रोड उल्हासनगर 3) नरेश फत्तु शर्मा वय 45 वर्ष राहणार आशीर्वाद सोसायटी सेक्शन तीन गुलजार रोड उल्हासनगर असे स्कार्पिओ गाडी नंबर MH05AJ0247 ही गाडी घेऊन सदर दरोडयाच्या गुन्ह्यात फरार आरोपी आहेत व ते सध्या नगर वरून शिर्डी कडे जात आहेत त्यांना ताब्यात घ्या असे कळवल्याने आम्ही सदर ची माहिती राहुरी पोलीस स्टेशन कडील पोलीस निरीक्षक श्री संजय ठेंगे साहेब व पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे साहेब यांना तात्काळ कळवले असता त्यांनी वरील अमलदार यांना ताबडतोब नाकबंदी करण्याची सांगून वरील गाडी व इसम यांना ताब्यात घेण्याचे सांगितले असता आम्ही वरील अंमलदार यांनी राहुरी कॉलेज जवळ नगर शिर्डी हायवेवर नाकाबंदी लावली असता सदर वाहन व गाडीतील इसम ह्यांना हात दाखवून थांबवण्याचा इशारा केला असता त्यांना पोलीस असल्याचा संशय आल्याने त्यांनी त्यांच्याकडे स्कार्पिओ गाडी भर धाव वेगात पळवली असता आम्ही पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून सीताफिने त्यांना ताब्यात घेऊन त्यांना राहुरी पोलीस स्टेशन येथे आणून त्यांना कोळसेवाडी पोलीस स्टेशन कल्याण कडील पोलीस उपनिरीक्षक सपाटे साहेब व त्याचे अंमलदार यांच्या ताब्यात पुढील तपासकामी देण्यात आले
सदर कारवाई मा. सोमनाथ घार्गे पोलिस अधीक्षक सो, अहिल्यानगर , मा. सोमनाथ वाघचौरे अपर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर , मा. जयदत्त भवर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग जि. अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय आर.ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन यांचे नेतृत्वात पोसई गणेश वाघमारे, पोलीस हवालदार शकूर सय्यद पो ना प्रवीण अहिरे पो. कॉ. प्रमोद ढाकणे, पो कॉ नदीम शेख, सचिन ताजने यांनी केली आहे.
राहुरी पोलिसांचे तत्पर कारवाई बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तसेच नागरिकान कडूनही कौतुक करत अभिनंदन करण्यात येत आहे









