बालाजी यात्रा उत्सव निमित्ताने आमदार विठ्ठलराव लंघे यांनी घेतले बालाजी रायाचे दर्शन.
नेवासा तालुका प्रतिनिधी युनूस पठाण.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे कोजागिरी पौर्णिमा निमित्त यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अखंड हरिनाम सप्ताहाचे ही आयोजन करण्यात आले होते.

अनेक वर्षापासून आमदार विठ्ठलराव लंघे हे बालाजीच्या दर्शनाला येत असतात बालाजी वर त्यांची नितांत भक्ती असल्याने दरवर्षी बालाजी दर्शन घेण्यासाठी आवर्जून उपस्थित असतात यानिमित्ताने आजही उपस्थित राहिले.

कार्यकर्त्यांच्या वतीने स्टॅन्ड ते बालाजी मंदिर फटाक्याच्या आतषबाजी मध्ये व ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर आमदार यांच्या हस्ते महाआरती व अभिषेक करण्यात आला. त्यानंतर बालाजी देवस्थानच्या वतीने व विविध संघटनेच्या ,शाखेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

अखंड हरिनाम सप्ताहाचे काल्याचे किर्तन महंत देविदास महाराज म्हस्के यांची कीर्तन रुपी सेवा असल्याने आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते संत पूजन करण्यात आले.

यावेळी आमदार यांच्या स्वागतास बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष आमदार समर्थक मच्छिंद्र पाटील मुंगसे, भाजप तालुका उपाध्यक्ष आकाश चेडे, सरपंच चंद्रकांत मुंगसे, उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, मा चेअरमन बाबासाहेब मुंगसे ,माजी उपसरपंच महादेव पुंड, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, विश्वस्त सुनील शेठ मुथा,ग्रामपंचायत सदस्य पोपट मुंगसे, भाजप नेते शरद शिंदे,किशोर मुंगसे, रघुनाथ कुटे पुढारी, युवा नेते उद्धव मुंगसे, युवा नेते निलेश कोकरे, युवा नेते सोपानराव शेंडगे,साहेबराव मामा कदम, वसंत कदम, महादेव मंदिर देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र कदम, बबन तात्या मुंगसे ,ओंकार तांबे, पिनू काळे ,बंडू मुंगसे, मधुकर क्षीरसागर, ज्येष्ठ पत्रकार बन्सी भाऊ एडके, देवस्थानचे सचिव रामानंद मुंगसे,बलभीम सकट, अरुण वांढेकर, हरिभाऊ देशमुख , देवगड सेवेकरी मंडळ आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.








