श्रीरामपूर तालुक्यातील श्री क्षेत्र हनुमान मंदिर खंडाळा येथे ३० ऑगस्ट पासुन आयोजित शिवपुराण कथा १ सप्टेंबर रोजी भगवान पशुपती नाथांच्या आरतीने संपन्न झाली
श्रीरामपूर ( प्रतिनिधी ) :- श्रीरामपूर तालुक्यातील श्री क्षेत्र हनुमान मंदिर खंडाळा येथे ३० ऑगस्ट पासुन आयोजित शिवपुराण कथा १ सप्टेंबर रोजी भगवान पशुपती नाथांच्या आरतीने संपन्न झाली.शिवपुराण कथाकार बाबा शास्त्री खंडाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.शेवटच्या दिवशी भर पावसात उपस्थित श्रोत्यांनी महापुराणाचा आनंद घेतला.
कथाकार बाबा शास्त्री यांनी शेवटच्या दिवसाची कथा सांगताना भक्तांना सांगितले की, शिवाच्या महात्म्याने भरलेले हे पुराण शिव महापुराण या नावाने प्रसिद्ध आहे.भगवान शिव हे पापांचा नाश करणारे देव असून त्यांचा स्वभाव अत्यंत साधा आहे. त्याचेही एक नाव भोला आहे. त्याच्या नावाप्रमाणे तो अत्यंत निष्पाप आणि सहज आनंदी असतो आणि भक्तांना अपेक्षित फल देतो.बाबा शास्त्री यांनी भाविकांना धार्मिक कार्यक्रमात भावना असणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.श्री स्वामी समर्थ सत्संग सेवा केंद्र खंडाळा व समस्त ग्रामस्थ खंडाळा यांच्यावतीने ३ दिवसीय संगीतमय श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते.कथेचा समारोप दिवशी ह भ प रामायणचार्य रेखाताई गायकवाड व मृदुंगाचार्य दिग्विजय भोरे महाराज यांनी देखील आपली उपस्थिती नोंदवली.कथेच्या तीनही दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.कथेसाठी आलेल्या बाहेर गावातील भाविकांसाठी राहण्याची व जेवणाची व्यवस्था खंडाळा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती.