हरित सेनेच्या नैसर्गिक रंग निर्मितीच्या कार्यशाळे मध्ये रंगून निघाले सावित्रिबाई फुले माध्यमिक विद्यालय .

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात हरित सेनेतर्फे नैसर्गिक रंग निर्मितीची कार्यशाळा घेण्यात आली .याप्रसंगी विद्यार्थिनींनी पालक या भाजी पासून हिरवा रंग ,पळसाच्या फुलापासून केसरी रंग , बीटा पासून जांभळा रंग ,झेंडूच्या फुलापासून लाल रंग, गुलाबाच्या फुलापासून गुलाबी रंग अशा विविध फुलापासून आणि भाज्यांपासून नैसर्गिक रंग बनविले .विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय अरुण तुपविहीरे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की रासायनिक रंगात असणाऱ्या विविध रासायनिक घटकामुळे आपली त्वचा डोळे व आरोग्यावर परिणाम होतो. डोळे चुरचुरणे ,त्वचेला खाज येणे, घशामध्ये खवखवणे यासारखे आजार होतात रासायनिक रंगांनी रंग खेळल्याने दरवर्षी अनेकांना रासायनिक रंगाची बाधा होते. काळा रंगातील ऑक्साईडमुळे मूत्रशयात बिघाड होतो .चांदी सारखे रंगात ॲल्युमिनियम ब्रोमाइड हे त्वचेला फारच घातक आहे .कॅन्सर सारखा भयंकर आजार यामुळे होतो. मात्र नैसर्गिक रंगांनी कोणतीही बाधा होत नाही .या ऋतूत ही सर्व फुलझाडे बहरलेली असतात. होळी व रंगपंचमी हा सण निसर्गाच्या सानिध्यात जाऊन साजरा केल्यास या सणाची रंगत वेगळीच असते .
विद्यालयाचे उपमुख्याध्यापक बाबासाहेब डोंगरे यांनी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, नैसर्गिक रंग निर्मिती करूनच मुलांनी रंगपंचमी साजरी करावी वसंत ऋतूची चाहूल लागलेली असताना येणारा हा सण खरा आनंद घेऊन येतो. निसर्गाच्या हातात हात घालून रंग खेळण्यात वेगळाच आनंद असतो. इयत्ता नववी मधील मिसबा शेख, श्रद्धा तोडमल, देवकर तेजस्विनी ,श्रावणी गाडे, जावळे शर्वरी आम्रपाली पारडे तनुश्री डोईफोडे या विद्यार्थिनींनी िविध फुलापासून आणि भाज्यांपासून रंग बनवून सादरीकरण केले यावेळी हरित सेनेचे सचिव बाळासाहेब डोंगरे ,विद्यालयाचे पर्यवेक्षक मनोज बाबा ,तुकाराम जाधव , संतोष जाधव, प्रकाश शिंदे, गव्हाणे सविता ,संदीप कुंभारे ,हलीम शेख यावेळी उपस्थित होते.