खासदार डॉ.निलेशजी लंके यांच्या जन्मदिनानिमित्त विद्यार्थांना शालेय साहीत्य वाटप.

खरवंडी कासार : अहिल्यानगर (दक्षिण) लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त खरवंडी कासार येथील श्री भगवान विद्यालय भगवानगड येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले .
लोकनेते खासदार डॉ निलेश लंके यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त हार, तुरे, शाल, बुके आदींवर होणारा अनाठायी खर्च न करता शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच गरजू कुटुंबांना मदत करण्याचा आव्हान आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने केले होते त्या अनुषंगाने खरवंडी कासार येथील भालगाव गणातील युवा नेते प्रणव भैय्या ढाकणे यांच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांना वही, पेन, भेट देत आपल्या नेत्याचा वाढदिवस एक सामाजिक उपक्रम म्हणून साजरा केला. यावेळी सपोनी राजेंद्र ढाकणे साहेब,प्रणव भैय्या ढाकणे, रमेश अंदुरे, मयूर काळुसे, विशाल कोळपकर, सुनील ढाकणे, आजिनाथ ढाकणे, अनिल भवर, डॉ. निलेश खेडकर, अंबादास ढाकणे, हरीभाऊ ढाकणे, शिवाजी अंदुरे, भगवान दिनाचे मुख्याध्यापक भालेराव सर पर्यवेक्षक वसंत खेडकर सर थोरात सर आंधळे सर ढाकणे सर विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
खासदार निलेश लंके यांचे सामाजिक कार्य सर्वश्रुत आहे. सर्वसामान्यांना आपलेसे वाटणारे व्यक्तिमत्व म्हणजेच खासदार निलेश लंके होय. समाजाप्रती आपल्या उत्तरदायित्व म्हणून सामाजिक कार्यात स्वतः निलेश लंके अग्रेसर असतात त्यांची सामाजिक कार्याची प्रेरणा घेत त्यांचे कार्यकर्ते देखील सामाजिक कार्य करत आहेत.