लोणी खुर्द_नेहरूनगर परिसरातील अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त.

लोणी खुर्द_नेहरूनगर परिसरातील अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त.

लोणी खुर्द_नेहरूनगर परिसरातील अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त.

          सविस्तर_लोणी खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील नेहरूनगर परिसरातील अतिक्रमणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तसेच नेहरूनगर येथील अंतर्गत रस्त्यावर अनेक नागरिकांनी वेगवेगळ्या प्रकारे अतिक्रमण करून नागरिकांना विनाकारण त्रास देण्यात येत असल्याचे नित्याचेच झाले आहे, त्यांना विचारणा केल्यास वाद घालून दमदाटी करण्यात येते, तसेच आपल्याकडे असलेले दोन चाकी_चार चाकी वाहने जाणीवूर्वक रोडवर पार्किंग करून नागरिकांना वेठीस धरण्याचे काम राजरोसपणे चालू आहे, त्याच प्रमाने रस्तावर झाडे लावणे, कचरा टाकने, कचरा कुंड्या रस्तावर ठेवणे, भांडे धुणे व धुण्याचे पाणी रस्तावर सोडणे असे प्रकार नित्याचेच होतांना दिसत आहेत, त्यामुळें अनेक आरोग्याच्या समस्या देखील वाढल्या आहेत, ग्रामपंचायत ला वेळोवेळी सांगून देखील ग्रामपंचायत, जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याची माहिती नागरिकांनी दिली.

          जाणीवूर्वक कोणी सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण करून नागरिकांना त्रास दिल्यास पोलिसांशी संपर्क करा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल...

          प्रवरानगर ते बाभलेश्र्वर मुख्य रहदारीच्या रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण.

          प्रवरानगर ते बाभलेश्वर रोडवर असलेले लोणी खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील पि.पि.एस कॉर्नर पासून ते नेहरूनगर पर्यंत अनेक दुकानदारांनी रोडवर मुरून व काँक्रिट टाकून दुकानात येण्याजाण्यासाठी पायऱ्या बनवण्यात आल्या आहेत, तसेच दुकानात येणाऱ्या गिऱ्हाईकांच्या गाड्या देखील भररस्तावर पार्किंग केल्या जातात, त्यामुळे शालेय विद्यार्थी व नागरिकांचे अनेक अपघात देखील झाल्याची माहिती मिळते.

          बाभलेश्वर प्रवरानगर रोडवरील बाभलेश्वर ग्रामपंचायत हद्दीतील म्हसोबा मंदिर_दत्तमंदिर ते लोहगाव रोडवर असलेला जोशिवाडा कोर्नवर देखील मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले असून, त्या ठिकाणी वाहतुकीच्या मुख्य रस्तावर बैलगाड्या, ट्रॅक्टर ट्रॉली उभे करणे, चारा टाकने, जनावरांचे वेस्टेज टाकने असे प्रकार राजरोसपणे होत असल्यामुळे सदरील कॉर्नर वर कायम अपघातांची मालिका सुरू असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळाली आहे.

          प्रवरानगर येथे देशभर नावलौकिक असलेला प्रवरा सहकारी साखर कारखाना, तसेच प्रवरा पब्लिक स्कूल, रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय, तसेच बाभलेश्वर पासून प्रवरानगर, पाथरे, सोनगाव ई. ठिकाणी जाणारा महत्वाचा रहदारी मुख्य रस्ता असतांना देखील सदरील रहदारीच्या मुख्य रस्त्यांवर प्रशासन जाणीव पूर्वक दुर्लक्ष करून, अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांना पाठिंबा देते का? असा प्रश्न आता निर्माण होतो, येत्या काळात एखादा मोठा अपघात होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जागे होईल का.? अशा संतप्त प्रतिक्रिया लोकांमधून येताना दिसत आहे.