माहिती अधिकार कायद्याचा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेने मांडला खेळ,अपील सुनावणीच्या पत्रात सगळाच झालाय झांगडगुत्ता .
माहिती अधिकार कायद्याचा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेतील अपिलिय अधिकाऱ्याने अक्षरश : खेळ मांडला आहे .जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर येथील अपिलिय अधिकारी यांनी पाठवलेल्या पत्रात तारखेचा मोठा सावळा गोंधळ केल्याचे दिसून येत आहे.
राहुरी तालुक्यातील डिग्रस गावचे रहिवासी तसेच माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेचे अहमदनगर उपजिल्हाध्यक्ष श्री . सचिन पवार यांनी 05/ 05/ 2022 रोजी माहिती अधिकाराच्या अर्जावर मा. सहाय्यक निबंधक सहकारी पतसंस्था मार्केट यार्ड राहुरी यांना राहुरीतील एका पतसंस्थे बद्दल काही माहिती मागितली होती.ही माहिती मुदतीत न दिल्यामुळे सदर अर्जदार यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर येथे दि. 08 / 06/ 2022 रोजी अपील केले होते .जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेतील अपिलिय अधिकारी यांनी दि. 17 /06/2022 रोजी अर्जदारास अपील सुनावणीस हजर राहण्यासाठी पत्र पाठवले . ( अपील क्र. 59 / 2022 ) सदर पत्र हे अर्जदारास दि. 20 / 06/ 2022 रोजी प्राप्त झाले .परंतु हे पत्र पाहताच अर्जदारास आश्चर्याचा धक्का बसला .
अर्जदाराने अपील अर्ज केला दि : 08 /06/2022 रोजी .जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेतील अपिलिय अधिकाऱ्याने अर्जदारास पत्र पाठवले दिः 17 / 06/ 2022 रोजी.अर्जदारास पत्र मिळाले दिः 20 / 06/ 2022 रोजी .परंतु अपिलिय अधिकाऱ्यांनी खरा गोंधळ केला तो सुनावणीच्या तारखेचा .जणू काही हा अधिकारी उलटा महिना मोजतो की काय असे वाटते .सुनावणीची तारीख त्यांनी अर्जदारास चक्क दि : 03/06/2022 अशी दिल्याने अर्जदाराचा मोठा गोंधळ उडाला आहे .यात विशेष बाब म्हणजे अर्जदारास मिळालेले पत्र हे पूर्ण टाईप केलेले आहे परंतु सुनावणीची तारीख 03/06/2022 ही हाताने लिहिलेली स्पष्ट दिसत आहे .आता अर्जदारास असा प्रश्न पडला आहे की दिः03/06/2022 ही तारीख केव्हा येणार ?आणि आपल्या अर्जाची सुनावणी कधी होणार?
असाच जर माहिती अधिकाराच्या कायद्याचा भंग करून प्रशासकीय अधिकारी जर स्वतःला हुशार समजत असतील आणि माहिती मागणाऱ्या अर्जदारांची दिशाभूल करत असतील तर या गोष्टीकडे गांभीर्याने पाहून शासनाने ठोस पाऊल उचलणे ही काळाची गरज बनली आहे .