ताजनापुर लिफ्ट टप्पा क्रमांक 1 चे पाणी मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन मोठा लढा उभारावा लागेल डॉ. शिवाजीराव काकडे साहेब
ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र १ चे पाणी मिळण्यासाठी शेतकरी बांधवानी एकत्र येऊन मोठा लढा उभारावा लागेल अँड डॉ शिवाजीराव काकडे साहेब.
भारत भालेराव
ग्रामीण प्रतिनिधी शेवगाव
शेवगाव: आज दि २७ रोजी मौजे वाडगाव येथे वरूर बु,वरूर खु, आखेगाव,मुर्शदपुर,हसनापूर, खरडगाव,सालवडगाव,थाटे,वाडगाव या ९ गावातील शेतीला बंद पडलेल्या ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र १ चे पाणी मिळावे यासाठी वरील गावातील सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची जाहीर बैठक आज पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहादेव जवरे गुरुजी होते तर कार्यक्रमास जि.प.सदस्या सौ.हर्षदा काकडे, जगन्नाथ गावडे,भाऊसाहेब सातपुते, मराठे भाऊसाहेब,सरपंच शंकर काटे, विष्णू म्हस्के,बंडू म्हस्के,नवनाथ ढाकणे, विश्वास ढाकणे, भारत लांडे, भाऊसाहेब पोटभरे, संदीप दसपुते, अमर राजेभोसले,आप्पासाहेब जवरे, देविदास गिर्हे,भाऊसाहेब राजळे, सुनील गवळी,मनोज घोंगडे,विनोद पवार,सर्जेराव ढाकणे,बाळासाहेब डोंगरे,श्रीधर धावणे, रंगनाथ ढाकणे, महादेव जवरे,भगवानराव डावरे, भाऊसाहेब बोडखे,भगवानराव गायकवाड,लहू जायभाये,दादासाहेब सातपुते,अक्षय केदार,आदिनाथ लांडे,विनोद मगर,शिवाजीराव औटी, आप्पासाहेब लांडे,नारायण टेकाळे आदि प्रमुख शेतकरी यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलताना काकडे साहेब म्हणाले की,हे पाणी आपल्या नऊ गावांना मिळण्यासाठी आतापर्यंत आपण खूप प्रयत्न केले.परंतु आपले प्रयत्न पक्षीय पातळीवर दुर्लक्षित केले गेले. आजही हा प्रश्न शासन दरबारी सर्व्हे होऊनही प्रलंबित आहे. त्यामुळे आपण आपले प्रपंचासाठी व उद्याच्या भविष्यासाठी पक्षीय जोडे बाजूला ठेऊन एकत्र येऊन लढा दिला पाहिजे.आपण शांत बसलो तर आपल्याला हे पाणी कधीच भेटणार नाही.प्रत्येकाने या पाण्यासाठी लढ्यात उतरायला हवे तरच हा प्रश्न मार्गी लागू शकतो असे ते म्हणाले.
यावेळी बोलतांना सौ.काकडे म्हणाल्या की,ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र २ च्या लढ्यात महिलांचा सहभाग मोठा होता. त्यामुळेच ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र २ च्या लढ्याला यश आले. महिला एखाद्या लढ्यात उतरल्या तर शासनालाही माघार घ्यावी लागते.त्यामुळे या नऊ गावाच्या पाण्यासाठी देखील महिलांनी या लढ्यात उतरले पाहिजे.
लहू जायभाये म्हणाले की,काकडे दांपत्यांनी हाती कोणतीही मोठी सत्ता नसताना ताजनापूर लिफ्ट टप्पा २ साठी मोठा लढा दिला व योजना पूर्ण करण्यास सरकारला भाग पाडले. तसेच ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र.१ च्या या लढ्यातही आपण सर्व त्यांच्या मागे ठाम उभे राहिल्यास निश्चित ते हा लढा यशस्वी करतील.
याप्रसंगी भाऊसाहेब सातपुते, शंकरराव काटे, विनायक काटे आदि प्रमुख शेतकऱ्यांची भाषणे झाली. यावेळी या ९ गावांतील प्रमुख शेतकऱ्यांची ‘पाणी कृती समिती’ जमलेल्या सभेतूनच निश्चित करण्यात आली.या कार्यक्रमास गोरक्ष भोसले,नामदेव ढाकणे, नामदेव केदार,विक्रम बांगर, मिठूभाऊ बोडखे,तबाजी बोडखे, शिवाजी सातपुते, लक्ष्मण बोडखे, अशोक ढाकणे,अकबर शेख, माणिक गर्जे,पंडितराव नेमाने, अशोकराव पातकळ,विनोद पवार, म्हातारदेव आव्हाड,गणेश मोरे, ज्ञानदेव कातकडे,श्रीधर गोर्डे, आत्माराम गोर्डे,रामराव जवरे, भानदास जवरे यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अंकुश दराडे यांनी तर वाडगावचे सरपंच सर्जेराव जवरे यांनी आभार मानले.
"""कोणत्याही पुढाऱ्याने आपल्या या प्रश्नावर आजपर्यंत लक्ष दिलेले नाही. आपल्याला जर कोणी पाणी मिळवून देऊ शकतील तर ते काकडे दाम्पत्यच देऊ शकतात. आपण पाणी प्रश्नासाठी सर्व पक्ष विसर्जित करून लढा दिला पाहिजे"""" -बंडू म्हस्के
,सरपंच वरूर.