बालनपणीचे मित्रमंडळी आले 40 वर्षांनी आले एकत्र......
बालनपणीचे मित्रमंडळी आले 40 वर्षांनी आले एकत्र......
शेवगाव येथे आबासाहेब काकडे रिमांड होम मध्ये शिकत असलेली माजी विद्यार्थी मेळावा शेवगाव येथे संपन्न.....
शेवगाव तालुक्यामध्ये आबासाहेब काकडे रिमांड होम मध्ये 40 वर्षांपूर्वी एकत्रित शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा सस्नेह मेळावा शेवगाव रिमांड होम मध्ये संपन्न झाला.
या संस्नेह मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी बन्सीधर आगळे सर हे होते तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ह.भ.प राम महाराज उदागे, तसेच प्राध्यापक विजय भोर सर मंचावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे सर्व विद्यार्थी हे 40 वर्ष पूर्वीच्या आठवणी अनुभव या कार्यक्रमाप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत मनमोकळेपणाने व्यक्त केले .
त्यामध्ये जुन्या आठवणींमध्ये सर्वच विद्यार्थी रंमुन गेले होते त्या आठवणींना उजाळा देत शालेय जीवनामध्ये शिक्षकांनी कशा पद्धतीने सांभाळ केला त्यानंतर चुकल्यानंतर कशा पद्धतीने योग्य ते मार्गदर्शन केले त्यामध्ये वेळ प्रसंगी शिक्षकांचा मार ही खाल्ला त्यामधील चाळीस वर्षाच्या कालखंडाच्या नंतर आज सर्वजण एकत्र आल्यामुळे सर्वांचेच डोळे पाणवले होते.
या 40 वर्षाच्या कालखंडाच्या नंतर भेटीचा आनंद हा आगळावेगळा या स्नेह मेळाव्यास प्रसंगी पहावयास मिळाला...
या स्नेह मेळाव्या प्रसंगी अनेक जणांनी आपले मनोगत व्यक्त केली त्यात बाबासाहेब खराडे, सखाहरी कोरडे ,बाबासाहेब जरांगे ,भाऊसाहेब सोलाट, पूजा राम , गोरक्षनाथ भगत ,अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले या टीम मधील अनेक जण शासकीय तसेच निमशासकीय अनेक उच्च पदावर सध्या कार्यरत आहेत.
या कार्यक्रम प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणातून श्री बन्सीधर आगळे सर खूप भाऊ झाले होते. ते आपल्या भाषणातून बोलताना म्हणाले की सर्व विद्यार्थ्यांना एवढ्या वर्षातून भेटल्याने खूप आनंद होत आहे तसेच माझ्या हातून हे विद्यार्थी घडले व चाळीस वर्षानंतरही त्यांनी माझी आठवण ठेवली व मला या कार्यक्रमास बोलवले त्याचा मला मनसोक्त आनंद होत आहे त्यावेळेस बन्सी आगळे सर पुढे आपल्या भाषणातून बोलतानी म्हणाले की त्यावेळेस तुम्हाला मारावे लागले काही तांत्रिक अडचणीमुळे काहीवेळी क्लास चालू असताना उशीर झाल्यामुळे उपाशी राहावी लागले परंतु मी हे तुमच्या भविष्यकाळासाठीच करत होतो. आणि त्याचेच प्रत्यय आज आपल्या सर्वांच्या उच्च पदावर ती काम करत असल्याचे मला समाधान होत आहे .
शालेय जीवनामध्ये शिक्षकीय पेशा मध्ये वावरत असताना सर्वच विद्यार्थ्यांना भविष्यकाळ उज्वल करण्यासाठी आम्हाला असे कठोर भूमिका घ्यावा लागतात त्यामधूनच विद्यार्थी घडत असतात काही काळापुरता विद्यार्थ्यांना मध्ये रागही येतो गुरुजनांविषयी असतो परंतु त्यानंतर विद्यार्थी घडल्यानंतर शालेय जीवनातील शिक्षकांनी दिलेला मार निश्चितच भविष्यकाळ उज्वल करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो त्याच्याच प्रत्यय आज मला आपल्या सर्वांच्या रूपाने या ठिकाणी दिसत आहे.
या कार्यक्रम प्रसंगी
सखाहरी कोरडे ,बाबासाहेब खराडे, भाऊसाहेब सोलाट, बाबासाहेब जरांगे, गोरक्षनाथ भगत, कातकडे , वाल्मीक कोरडे ,दुधाडे , प्रभाकर जाटे, , नाना चेडे, उबाळे, ,परमेश्वर खराडे, दत्तात्रेय काळे, शिवाजी काळे, रंगनाथ घारे, प्रकाश थोरात ,रामकिसन थोरात,मारुती थोरात ,पुंजाराम सोलाट, सय्यद लाला, नानासाहेब जावळे, केशव दुधाडे ,अशोक दुधाडे, सुखदेव पवार, जालिंदर गटकळ, दादासाहेब गटकळ, असे सर्व माजी विद्यार्थी या मेळाव्यास प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम अतिशय आनंदीमुळे वातावरणामध्ये घडवून आणण्यासाठी सखाहरी कोरडे यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब खराडे यांनी केले तर आभार प्रदर्शन भाऊसाहेब सोलाट यांनी केले तद नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.