मराठा आरक्षणाबाबत राजकारण करणाऱ्यांना त्याची किंमत मोजावीच लागणार!-मराठा एकीकरण समिती.

मराठा आरक्षणाबाबत राजकारण करणाऱ्यांना त्याची किंमत मोजावीच लागणार!-मराठा एकीकरण समिती.

अखंड जगाने ज्यांचे विचार मान्य केले असे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी साजरी करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटक कोरोना रोगाच्या प्रादुर्भावा नंतर पुढे सरसावला आहे.गेल्या दोन वर्षांपासून कोरोना रोगाच्या धास्तीने किंवा शासनाने घालून दिलेल्या निर्बंधानामुळे लोक एकत्र येत नव्हते.त्यामुळे कुठलेच कार्यक्रम अथवा आंदोलने मोठ्या स्वरूपात झाले नाहीत.

परंतु २०२२ याला अपवाद ठरणार असे दिसत आहे. १९ फेब्रुवारी ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अवघा समाज एकत्र येणार असे चित्र निर्माण झाले आहे.शिवजयंती निमित्ताने एकत्रित आलेला मराठा पुन्हा आरक्षण या विषयावर राज्यकर्त्यांवर तुटून पडणार का ? हे गरजेचे आहे.

 महाराष्ट्रात २०१६ मध्ये कधी नव्हे तो मराठा समाज कोपर्डीच्या घटनेनंतर लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरला.महाराष्ट्रात अठ्ठावंन मराठा क्रांती मुक मोर्चे निघाले.कोणी स्वप्नात देखील विचार केला नसेल इतका अभूतपूर्व प्रतिसाद या मोर्चास मिळाला.

गेल्या अनेक वर्षांपासून केवळ “मराठा” या नावाला धरून अनेक संघटना आज महाराष्ट्रात काम करत आहेत.या संघटनांनी देखील मराठा समाजाच्या मागण्यान संदर्भात अनेक मोर्चे काढले आंदोलने केली परुंतु काही विशिष्ट भाग किवा जिल्ह्यान पुरतेच त्याचे अस्तित्व राहिले.त्या कारणाने सरकारवर हवा तसा दबाव न पडल्यामुळे सत्तेच्या राजकारणात समाजाच्या विषयांचे घोंगडे जाणीवपूर्वक भिजत ठेवले गेले. बोटावर मोजण्याइतक्या संघटनांनी आजही समाजाच्या प्रश्नांसाठी लढा चालूच ठेवला आहे.संघटनांचा लढा चालू असतांना समाज बांधवांकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता.त्याची अनेक कारणे असत कधी त्या संघटनेचे नाव समर्पक नसे,कधी संघटनेचे नेतृत्वच मान्य नसणे किवा एखाद्या संघटने विचारधारा मान्य नसणे अशा अनेक कारणांमुळे मराठा म्हणून एक संघटन कधी पुढे आलेच नाही.प्रत्येकाने मीच समाजाचे प्रश्न खऱ्या अर्थाने जाणतो या अविर्भावात स्वतंत्र गट करून संघटना काढल्या परंतु या संघटनांना संपूर्ण महाराष्ट्र भर काम करता आले नाही. अपवाद वगळता कै.आण्णासाहेब जावळे पाटील यांची अ.भा.छावा संघटना,मराठा सेवा संघ , अमित दादा चव्हाण यांची मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान 

खऱ्या अर्थाने मराठा क्रांती मुक मोर्चा मध्ये हजारो-लाखो लोक सहभागी होण्याचे मुख्य कारण म्हणजे कोपर्डी घटनेची भावनिक झालर.कोपर्डी घटनेच्या अगोदर महाराष्ट्रात किंवा देशात बलात्कारा सारख्या घटना घडल्याच नाहीत का ? अचानकपणे अस काय झाले कि समाज जागा झाला. कुठली तरी अदृश शक्ती या सर्व मोर्चान मागे होती अशी शंका येते.जाणीवपूर्वक मराठा समजाचे नेतृत्व करता करता कोणी मोठा नेता तयार होऊ नये याची पद्धतशीर पणे त्या अदृश्य शक्तीने काळजी घेतली असे वाटते.कोणाचेच खंबीर नेतृव नसल्यामुळे एव्हढे लाखोंचे ऐतिहासिक मोर्चे निघून देखील मराठा समाजाच्या पदरात काय मिळाले हा प्रश्न पडतो.लाखोंचे मोर्चे निघालेत समजाचा मनातील जी राज्यकर्त्यांविषयी चीड होती ती आजच निर्माण झाली का ? गेल्या २०-२५ वर्षांपासून मराठा समाजाच्या मागण्यासाठी लढा चालू आहे,अनेक सरकारे आली आणि गेली परंतु अचानक एवढा उद्रेक विचार करण्याचा विषय आहे.

ज्या काही मराठा संघटना यात सामील झाल्या होत्या, त्यांच्यात समन्वय आणि सुसंवाद नव्हता. आजही नाही. पूर्वीही कधी नव्हता. छावा- संभाजी ब्रिगेड – मराठा सेवा संघ या मुळ संघटनांमधून फुटून किती संघटना तयार झाल्या? याचा निश्‍चित आकडा नाही, परंतु महाराष्ट्रात अशा नोंदणीकृत अनधिकृत किमान दोन-अडीचशेतरी संघटना असतील. कदाचीत त्याहून अधिक. रिपब्लीकन पक्ष निदान पदरात आरक्षण-सवलती पडल्यानंतर फुटला-विखुरला. मराठा ऐक्य काही मिळण्याआधीच विखुरले. घराघरात लेकी-सुनांवर, बाया-बापड्यांवर जे अत्याचार होतात त्याचे काय? दारू पिऊन बायकांना मारझोड करणे, मुलींना दुय्यम वागणूक देणे. हा देखील अत्याचारच आहे.आरक्षणाचे ठिक आहे, परंतु अ‍ॅट्रॉसिटी कायद्या मधील जाचक अटी कमी कराव्यात ही मागणी असतांना, अ‍ॅट्रॉसिटी कायदा बंद करवा हा मुद्दा कोणी घुसडवला? कोणाचेच नेतृत्व नको ही टूम कोणी काढली? भाषणे नाही, घोषणा नाही, मुक मोर्चा. सरकारला निवेदनही नाही. मग कशासाठी होता हा सगळा खटाटोप. कोणी घडवून आणला. लोक कशासाठी जमवले,नुसता इव्हेंट झाला.समाजातील कष्टकरी शेतकऱ्यांनी,मजुरांनी,नोकरदार वर्गाने भावनिक सादेला प्रतिसाद देत मोर्चा साठी निधी जमा केला.मोर्चाचा उद्देश चांगला होता पण फलीत दिसले नाही.आता एकत्र येण्याची वेळ आली आहे.आता आपण एकत्र आले कि आपल्या मागण्या मान्य होतील या आशेवर लोक लाखोंच्या संख्येने एकत्रित आले.जे काम अनेक संघटनांना येवढी वर्षे काम करून देखील जमले नाही ते काम अगदी कमी वेळात होतांना दिसले.समाज संघटीत रित्या स्वखर्चाने रस्त्यावर उतरला.परंतु तेव्हड्याच कमी वेळात विखुरला असे वाटते.

त्या अदृष्य शक्तीचा अजेंडा ठरलेला होता असे वाटते. बोलवायचे कोणालाच नाही. कोणाला बोलूच द्यायचे नाही. कोणाला नेतृत्वही करू द्यायचे नाही. सगळ्यांना या गर्दीचे श्रेय हवे होते आणि प्रत्येकाला ते दुसर्‍या कोणाला मिळू द्यायचे नव्हते. अजूनही मराठा क्रांती मोर्चा नावाने जी काही समन्वय समिती आहे ती राज्यस्तरीय नाही, किंवा राज्य पातळीवर सर्वांना ती मान्य नाही. या चळवळीला आजही कोणी नेता वा कार्यकारिणी नाही. बैठक झाली तर त्याचे प्रोसिडींग होत नाही. ठराव मांडून निर्णय होत नाहीत. त्यावर सह्या होत नाहीत. सह्या कोणी करायच्या हा प्रश्‍न आहे. कुठे मेळावा झाला तर त्याला प्रायोजक असतो. होर्डींगला प्रायोजक, मिटींगला प्रायोजक, पाँपलेटला प्रायोजक, चहा-पाणी अल्पोपहार किंवा जेवणाला प्रायोजक, शिवजयंती, जिजाऊ जयंती, संभाजी महाराजांची जयंती, कोणत्याही कार्यक्रमाला वर्गणी गोळा केली जाते. झेंडे-रूमाल-पाहुण्यांना द्यायच्या शाली-बुके, मंडप, स्पीकरसाठी सुद्धा दाते शोधले जातात. या अशा मंडळींकडून कोणत्या त्याग आणि

समाजकार्याची अपेक्षा करायची तुम्हीच सांगा ?

खरे सांगायचे झाले तर सगळा शक्ती-बुद्धी-युक्तीचा अपव्यय सुरू आहे. लाखोंच्या संख्येने मराठे एकत्र जमले हे या संघटनांमुळे नव्हे, तर काहीतरी चांगले घडण्याची शक्यता वाटली म्हणून. गर्दी दिसली तर सरकार हादरेल. काहीतरी करेल, असे वाटले म्हणून लोक जमले. पण मराठा क्रांती मोर्चातील विविध सामील संघटनांच्या स्वयंभू नेत्यांनी श्रेयवादाच्या लढाईत या ‘लाखों’च्या गर्दीचा विश्‍वासघात केला.अगदी नेहमीच्या सवयी प्रमाणे स्वतःला समजा समोर मीच करता करविता किंवा मलाच समाजाचा खरा कळवळा हे दाखवण्याचा निष्फळ प्रयत्न केला व आजही करत आहेत.समाज अशा प्रवृत्तींना चांगलाच ओळखून आहे.स्वयंभूः नेत्याचा संघटन कौश्यालायचा भ्रमाचा नुसताच फुगा झाला आहे.नेतृत्व दिसतंय परंतु मागे काम करणाऱ्या कार्यकर्त्याची फळी मात्र दिसत नाही.वाहिन्यांन समोर,सोशल मेडीयावर केवळ मोठ मोठ्या गप्पा सांगायच्या आणि कृती शून्य असे हे नेते.ना

ण्याला जशा दोन बाजू असतात तशी दुसरी बाजू म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात ज्या संघटनांनी जातीपातीच्या विषमतेच्या भिंती पडण्याचे काम केले होते त्या जातीच्या विषमतेच्या भिंती पुन्हा निर्माण झाल्या सारखे वाटते.मराठा क्रांती मुक मोर्चा हा कोणत्या जाती किंवा धर्माच्या विरोधात मुळीच नव्हता.परंतु ज्यांना समाजाच्या नावावर आपले राजकीय अस्तित्व टिकवायचे आहे त्यांनी अठरा पगड जातीं मधील समाज बांधवांच्या मनात विष कालवून जाणीवपूर्वक बहुजन क्रांती मोर्चे काढण्यास प्रवृत्त केले.कुठे तरी मराठा क्रांती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चांची स्पर्धाच लागली होती कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.मराठा समाज कित्तेक दशकानंतर एकत्रीत पणे संपूर्ण बहुजन समाजाला सोबत घेऊन आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी संघटीत झाला होता हे काही जातीचे राजकारण करणाऱ्या लोकांना का सहन झाले नाही हे न समजलेले कोढे निर्माण झाले आहे.वि

शेष म्हणजे आज पर्यंत ज्या जातीय राज्यकर्त्यांचा हस्तकांनी राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशासमोर छत्रपती शिवाजी महाराजांन विषयी खोटा इतिहास सांगून मराठा(हिंदू) मुस्लिम वाद लावून दंगली भडकावल्या व राजकारणा साठी वापर केला.त्याच मुस्लिम बांधवांनी हम सब भाई भाई चा नारा देत मराठा क्रांती मुक मोर्चातील मराठा (हिंदू) बांधवांसाठी शक्य ती(चहा,पाणी,नाष्टा) मदत केली.काही जिल्ह्यांमध्ये तर भगवा खांद्यावर घेऊन मोर्चात सहभागी झाले.हेच या मोर्चाचे फलित म्हणावे लागेल.

अजून वेळ गेलेली नाही. पण अजूनही हे सगळे शहाणे झाले नाही. शहाणपणाने वागले नाही. एक झाले नाही. कोणातरी एकाला नेतृत्व देऊन, कार्यकारिणी बनवून, अजेंडा ठरवून लढा चालवला नाही तर मग सगळे संपेल.

माझ्या मते आरक्षणाचा मुद्दा राज्य सरकारच्या हातात नाही. घटनात्मक अडचणी आहेत.आरक्षणाचा लढा संसदेत लढावा लागेल. राज्यात मराठ्यांनी जास्तीत जास्त शैक्षणिक-आर्थिक सवलती पदरात पाडून घेणे हिताचे आहे.

नुकतेच खासदार छत्रपती संभाजी महाराज भोसले (कोल्हापूर) यांनी मराठा आरक्षण व इतर मागण्या न झाल्यामुळे २६ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे.मुळात आरक्षणाचे जनक म्हणून ज्या छत्रपती शाहू महाराजांना अवघा समाज डोक्यावर घेतो त्यांच छत्रपतीं घराण्यातील १३ व्या वावंशजाला आरक्षणाच्या मागणी साठी उपोषणाला बसावे लागते ..... देणाऱ्या हातांना आज मागण्याची वेळ येते ही खूप मोठी शरमेची बाब आहे.

 संयमी आंदोलनाने प्रश सुटले तर चांगलेच आहे....

युवा पिढीची मानसिकता व संयम सुटत चालला आहे... भविष्यात शांततेच्या मार्गाने चालेले आंदोलन हिंसात्मक मार्गाने जायला नको,जर तरुणांनी मार्ग बदललाच तर राज्यकर्त्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागेल हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.

१९ फेब्रुवारी २०२२ शिवजयंती मराठा आरक्षण आंदोलनासाठी फलित ठरो हीच सदिच्छा...!!

एक मराठा..... लाख मराठा....

शिवश्री देवेंद्र सिताराम लांबे पाटील  

अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष,

समन्वयक, मराठा एकीकरण समिती

9822845152